पुणे

Pune Crime: 'फोनवर कोणाशी बोलतोस?', असं विचारल्याने चिडलेल्या प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन: 'फोनवर कोणाशी बोलतोस, अशी विचारणा केल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. २६) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका हॉटेलमध्ये घडली.

याप्रकरणी ३६ वर्षीय प्रेयसीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. अविनाश बबन गिरी (वय ३४, रा. तरडे, ता. हवेली) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेयसी आणि अविनाश गिरी याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. हे दोघेही गुरुवारी दुपारी भेटणार होते. त्यानुसार फिर्यादी भेटण्यासाठी निघाल्या होत्या. तेव्हा कुंजीरवाडी येथील एका हॉटेलच्या बाहेर त्यांना अविनाश गिरी याची गाडी आढळून आली. म्हणून त्या हॉटेलमध्ये गेल्या.

त्यावेळी तो तेथे बसून दारु पित फोनवर कोणाशी तरी अश्लिल भाषेत बोलत होता. फिर्यादी यांनी "तू कोणाबरोबर असे घाणेरड्या भाषेत बोलत आहेस", असे विचारले असता त्याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या हाताच्या अंगठ्याजवळ दुखापत झाली आहे.

याबाबत फिर्यादी प्रेयसी यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अविनाश गिरी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार करे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उज्जैनच्या Mahakal Temple ची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

हॅरी पॉटर फेम आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री Maggie Smith यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

Pune Crime News: मुळशीच्या जमिनीचा वाद; दुहेरी हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप

Katraj Dairy: कात्रज डेअरीकडून खुशखबर! दुधाच्या दरात शेतकऱ्यांना दोन रुपयांचा फरक मिळणार

SCROLL FOR NEXT