पुणे

Pune Crime: सरकारी कामात निर्माण केला अडथळा, ९ जणांविरूध्द गुन्हा दाखल !

पराग जगताप

Otur Crime News: वनविभागाकडून सरकारी कामात अडथळा आणून शस्त्र दाखवत मारहाण केल्या प्रकरणी नऊ जणान विरूध्द ओतूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.(Pune Crime News )

अंकुश तोतरे,मनोहर गाजरे,मुकुंद उर्फ भाऊ रामचंद्र कुटे,अक्षय कुटे सर्व रा.पिंपरी पेंढार ता.जुन्नर जि.पुणे,अश्विनी गोविंद शिंगोटे रा.पिंपळवंडी काकडपटा ता.जुन्नर,विजय कालेकर रा.पिंपळवंडी ता.जुन्नर.जि.पुणे व इतर इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्ती यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत वनरक्षक अश्विनी देविदास राऊत यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत ओतूर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की ता.१० मे रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास पिंपरीपेंढार (ता.जुन्नर) येथे शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला असता त्यात सदर महिलेचा त्यात मृत्यू झाला. सदर ठिकाणी वन विभागाचे लोक पुढील कायदेशीर कारवाई करणे कामी गेले असता वरील आरोपी यांनी वनरक्षक सुवर्णा खुटेकर यांचा गळा दाबून, हाताने मारहाण केली आहे. (junnar crime news)

तसेच आरोपी विजय कालेकर याने तलवार हातात घेऊन लोकांना भडकावून, दहशद निर्माण केली. अशा प्रकारे सर्व आरोपींनी बेकादेशीर जमाव जमवून, उपस्थित लोकांना भडकावून, दंगा करून, सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. (crime in a government Office in maharashtra pune)

यातील जखमी वनरक्षक सुवर्णा खुटेकर यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते व नंतर त्यांना तेथून डिस्चार्ज मिळाला. परंतू त्यांचा गळा दाबल्याने गळ्यावरती व मानेवरती सूज आल्याने अद्याप पर्यंत त्यांना बोलता येत नसल्यामुळे पुन्हा पुढील उपचारासाठी ता.१५ मे रोजी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय, मंचर येथे पाठवले.तसेच मंचर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावरती पुढील औषधोपचार व सर्व तपासण्या केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवले.

त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.सदर घटनेत एक ही आरोपीला अजून अटक करण्यात आली नसून पुढिल तपास ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर करीत आहे.(crime in government work)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT