पुणे

Pune Crime: आयुर्वेद मसाज केंद्राच्या नावाखाली पुण्यात सुरू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केली कारवाई

Pune: या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर तीन महिलांची सुटका केली आहे

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला

माणिक बागेत जैन मंदिर शेजारी मोरया आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर तीन महिलांची सुटका केली आहे

सिंहगड रस्ता परिसरातील माणिक बाग येथील जैन मंदिराशेजारी असलेल्या आदर्श आपारमेंट मधील फ्लॅट नंबर दोन येथे मोरया आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्र चालवले जात होते या उपचार केंद्राच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला कळली त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली आणि छापा टाकून येथील व्यवसायाचा पर्दाफाश केला.

पीडित महिलांकडून हा व्यवसाय आरोपी चालवत असे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फिर्याद दिली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT