पुणे

Pune Crime: चाकण, महाळुंगे परिसरात अल्पवयीन गुंडांची दहशत वाढतेय

हरिदास कड

Khed Crime: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजार आवारात नुकताच अल्पवयीन सहा ते आठ तरुणांनी हातात काठ्या,विटा, दगड घेऊन शेतकरी तसेच वाहन चालक व बाजार समितीच्या एका संचालकाला मारहाण केली होती.

त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी संबंधित काही आरोपींना ताब्यात घेतले परंतु बहुतांश आरोपी अल्पवयीन होते.

या प्रकरणावरून परिसरात मोठा गदारोळ उडाला.बाजार समितीच्या आवारात बेधुंद अवस्थेत गुंड रात्रीच्या वेळी घुसतात. शेतकरी,अडते,व्यापारी, वाहनचालक, संचालक यांच्यात दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. बेधुंद अवस्थेत असलेले गुंड अक्षरक्ष: रात्री दीडच्या सुमारास तसेच सकाळी हैदोस घालतात.

तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर शिक्षण घेणाऱ्या एका साधक विद्यार्थ्याला चौघे आरोपी बेदम मारहाण करतात त्याचे हाड फ्रॅक्चर करतात. या प्रकारामुळे चाकण, महाळुंगे परिसरात अल्पवयीन गुंडांची दहशत वाढतेय असे चित्र आहे. या वाढत्या प्रकारामुळे पोलिसांची भीती कमी होतेय का असा सवाल नागरिकांचा व इतरांचा आहे.

काही महिन्या पूर्वी चाकण येथे रात्री साडे अकराच्या सुमारास एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाचा दगडाने ठेचून दोघा अल्पवयीन तरुणांनी निर्घृणपणे खून केला होता.त्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे अल्पवयीन तरुणांना कोणाचे काही देणे घेणे नाही. अल्पवयीन तरुण पोलीस आणि कोणालाही घाबरत नाही हे वास्तव समोर येत आहे. ज्या अल्पवयीन तरुणाचा खून केला होता तो कनेरसर, ता. खेड येथील एका तरुणाच्या खून प्रकरणात आरोपी होता.

खून करणाऱ्या दोघांपैकी एकावर यापूर्वी गुन्हे दाखल होते. चाकण, महाळुंगे परिसरात पोलिसांची दहशत कमी पडत आहे त्यामुळे परिसरात नागरिक, उद्योजक, व्यापारी, अडते,कामगार यात अल्पवयीन तरुणांच्या दहशतीचे सावट निर्माण झाले आहे. पोलिसांची भीती कमी होतेय का असाही सवाल निर्माण केला जात आहे.

चाकण व परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रकार पाहिले तर त्यात सहभागी असणारी मुले ही अल्पवयीन विधी संघर्षित बालके आहेत. अल्पवयीन मुलांनी चाकण परिसरात यापूर्वी सहा खून केलेले आहेत.

अल्पवयीन तरुणांकडून चाकण परिसरात किल्ल्यातील खून, मेदनकरवाडी बालाजी नगर येथील खून, पीडब्ल्यूडी च्या जागेतील खून, रोहकल फाटा येथील खून या सर्व गुन्ह्यातील आरोपी हे अल्पवयीन मुलेच होती. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहत तसेच महाळुंगे परिसरातील खून हे अल्पवयीन मुलेच करताहेत हे उघड होत आहे.

चाकण परिसरातील गुन्हेगारीचा ट्रेंड हा अल्पवयीन मुलांचाच आहे हे भयानक वास्तव आहे. यामुळे गुन्हेगारी वाढतेय का हा सवाल निर्माण होत आहे.

अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी ही पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. अल्पवयीन मुले बहुतांश प्रमाणात गांजाचे सेवन करतात व काही हस्तकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गांजा ही विकतात त्यांची साखळी निर्माण झालेली आहे.असे चित्र चाकण व महाळुंगे परिसरात पाहावयास मिळते आहे.

चाकण येथील औद्योगिक वसाहत, महाळुंगे परिसरात व चाकण परिसरामध्ये बकालीकरण सध्या वाढले आहे. देशातून येथे कामगार वर्ग राहण्यास आला आहे. परिसराचे सध्या निमशहरीकरण झाले आहे. "इझी मनी" मिळविण्यासाठी जो, तो धडपड करू लागला आहे.

अल्पवयीन मुले शाळा, कॉलेजात न जाता एकत्र गट करून, फ्रेंड सर्कल करून, ग्रुप करून वावरत आहेत. सोशल मीडियावर ही मुले ऍक्टिव्ह आहेत. कधी शाळा,कॉलेजच्या बाहेर बसून टुकारपणे बाईक फिरवत आहेत.

मुलांचा वेगवेगळा फंडा येथे चालतो आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळ्या येथे निर्माण होत आहेत. त्यांना पोसणारे काही तरुण, गॉडफादर आहेत. सोशल मीडियावर अनेक ग्रुप व्हाट्सअप वर कार्यरत आहेत. त्यातून वेगवेगळ्या पोस्ट केल्या जात आहेत.

फेसबुक वरही ग्रुपच्या माध्यमातून ही मुले सक्रिय असतात. औद्योगिक वसाहतीत अगदी ठेकेदारी मिळविण्यासाठी ही अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. अल्पवयीन मुलांना अटक केली जात नसल्याने खुनाच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले सातत्याने सहभागी असतात.चौदा,पंधरा ते सतरा,अठरा वर्षाच्या आतील मुले यामध्ये विशेष सहभाग घेतात.

या मुलांना अटक केली जात नसल्याने तसेच थोडी समज देऊन चौकशी करून त्यांच्या आई-वडिलांकडे,कुटुंबाकडे त्यांना सुपूर्द केले जाते. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.चौदा ते अठरा वर्ष आतील मुले विनयभंग, चोरी, लुटमार,बेकायदा शस्त्र बाळगणे, हाणामारी करणे, चाकू हल्ला करणे, खून करणे यामध्ये त्यांचा सहभाग वाढतो आहे.अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही.

त्यामुळे अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संस्कारांचा अभाव, वाईट संगतीमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. व्यसनांची पूर्तता करण्यासाठी तसेच इझी मनी मिळविण्यासाठी अल्पवयीन मुले चोरी करतात तसेच हाणामाऱ्या खुनाचे प्रकार करत आहेत. काही अल्पवयीन मुले,ग्रुप अगदी खुनाच्या सुपारी घेतात . अल्पवयीन मुलांना एखाद्या खून प्रकरणी किंवा इतर प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून घ्यावे लागते.अशा अल्पवयीन मुलांना खुन आदी गुन्हा केल्यानंतर बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते.

अठरा वर्षे पेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून उल्लेख केला जातो. त्यांना कायद्याने मोठे संरक्षण दिले आहे. अल्पवयीन मुलांना बालनिरीक्षण गृहात पाठवले जाते,ठेवले जाते. पालकांच्या संमतीने किंवा चांगल्या वागणुकीच्या हमीवर त्यांना सोडून दिले जाते. काही होत नाही अशी भावना मुलांच्या मनात होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे.

याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, 'बाजार समितीच्या आवारात दहशत घातलेल्या गुंडावर कारवाई केलेली आहे. बहुतांश मुले अल्पवयीन आहेत. चाकण परिसरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत.

बाजार समितीच्या आवारात गुंडांनी दहशत केल्यानंतर तेथे सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.चाकणमधील अल्पवयीन मुलांची गुंडगिरी कमी करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांच्या वतीने पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार त्या मुलांना संस्कार क्षम बनविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumabi Traffic Ambani Wedding : मुंबईत अंबानींचा हायप्रोफाईल लग्नसोहळा, वाहतुकीत महत्वाचे बदल; 'या' मार्गावर जाणं टाळा

T20 World Cup: 'तोही रडत होता अन् मीही, तेव्हा...', रोहितबरोबरच्या 'त्या' खास क्षणाबद्दल विराट झाला व्यक्त

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT