pune crime theft case sinhagad road 1 lakh stolen police cctv Sakal
पुणे

Pune Crime : बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथील घटना;पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद

निलेश बोरुडे

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील खडकवासला येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही चोरीची घटना घडली असून घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरांची हालचाल कैद झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नूतन रामचंद्र मते व छाया रामचंद्र मते (रा. विठ्ठल मंदिरासमोर, खडकवासला) या दोघी बहिणी काल नातेसंबंधातील महिलेच्या अंत्यविधीसाठी परगावी गेल्या होत्या. आज सकाळी घराशेजारी राहणाऱ्यांनी नूतन व छाया मते यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले असल्याचे व घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे फोन करु कळविले.

दोघीही बहीणी तातडीने घरी आल्या असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेल्या ठिकाणी त्यांनी शोधाशोध केली परंतु दागिने व पैसे आढळून आले नाहीत.

चोरट्यांनी सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व तेवीस हजार रुपये रोख असा एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून याबाबत नूतन मते यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हवेली पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली असून यामध्ये पाच चोरट्यांची हालचाल कैद झाली आहे. प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी तावरे अधिक तपास करीत आहेत.

गस्तीची गाडीच येत नाही!....... काही दिवसांपूर्वी या भागात चोरीची घटना घडलेली असून रस्त्यावरील सौर पथदिव्याची बॅटरी एका चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी चोरुन नेली होती. आताही बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला व बिनधास्तपणे हे चोरटे चालत जाताना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहेत.

पोलीसांची रात्र गस्तीची गाडी मुख्य रस्त्यावरून जाते,आत येत नाही असा आरोप नागरिक प्रशांत सांगळे यांनी केला आहे. त्यामुळे चोरीच्या घटना थांबविण्यासाठी पोलीसांनी या परिसरातही गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT