Pune Crime :  sakal
पुणे

Pune Crime : पुण्यात गुन्हेगार मोकाट....कोण आवरणार? बंगल्यात घुसून शस्त्राचा धाक दाखवून केली चोरी

सकाळ वृत्तसेवा

Pune Latest News: एरंडवण्यातील एका बंगल्यात घुसून चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चंदनाचे झाड चोरी केले. ही घटना शनिवारी (ता. १०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून डेक्कन पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कुटुंबासमवेत एरंडवण्यात जुन्या कर्नाटक शाळेजवळ भारती निवास कॉलनीत राहतात. शनिवारी (ता. १०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चोरटे बंगल्यात शिरले.

त्यावेळी गाढ झोपेत असलेल्या महिलेसह कुटुंबीयांना बंगल्यात कोणीतरी शिरल्याचा आवाज आला. बंगल्याच्या बाहेर येऊन पाहिले असता सात-आठ चोरटे चंदनाचे झाड करवतीने कापत असल्याचे दिसून आले. महिलेने आरडाओरडा केला, तेव्हा चोरट्यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

चोरट्यांनी बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला. याबाबत महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल आणि सहाय्यक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT