Crime esakal
पुणे

Pune Crime : प्रेमास नकार दिल्याने तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

प्रेमास नकार दिल्यामुळे एका तरुणाने ‘माझे तुझ्यावर प्रेम असून, माझ्याबरोबर न आल्यास तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकीन’ अशी तरुणीला धमकी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्रेमास नकार दिल्यामुळे एका तरुणाने ‘माझे तुझ्यावर प्रेम असून, माझ्याबरोबर न आल्यास तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकीन’ अशी तरुणीला धमकी दिली. ही घटना बोपोडी परिसरात घडली. या प्रकरणी बोपोडीमधील एका २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून यश रोहित पटेकर (वय २२, रा. बोपोडी) याच्याविरुध्द खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि यश हे दोघे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु तो तरुणीला सतत फोन करुन त्रास देत होता. त्यामुळे तिने त्याचा मोबाईल ब्लॉक केला. तेव्हा त्याने ‘फोटो व्हायरल करून कुटुंबाची बदनामी करीन. तसेच, माझ्यासोबत न आल्यास अंगावर अ‍ॅसिड टाकीन,’ अशी धमकी दिली. तरुणीने त्याला नकार दिल्यावर ‘माझ्याही जीवाचे बरेवाईट करीन’, असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT