पुणे - मागील अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मात्र या कारवाईत धक्कादायक गुन्हे उघड झाले असून ३ महिलांनी तब्बल २०० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचं उघड झाली आहे. (Crime News in Marathi)
भिकारी असल्याचा बनाव रचत या महिलांनी डाव साधला. सोन्या चांदीच्या दागिन्यासह परदेशी चलन तसेच मौल्यवान किमतीचे गड्याळ आणि इतर वस्तू महिलांनी लंपास केल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी २ महिलांना जालना आणि बीड मधून अटक केली असून त्यांच्याकडून ८० तोळे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तु जप्त केल्या.
पुण्यातील उच्चभ्रू भाग असलेल्या पाषाण येथील शिंदे सोसायटीमध्ये ही घटना घडली. समीर दयाल यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. हा सगळा प्रकार ११ डिसेंबर रोजी घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत २०० तोळे सोन्याचे दागिनेपैकी ८० तोळे सोने जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयाल यांचा बंगला पुण्यातील पाषाण भागात असणाऱ्या सिंध सोसायटीमध्ये आहे. चोरी करणाऱ्या महिला या बीड तसेच जालना या जिल्ह्यातील असून या बंगल्याबाहेर त्यांनी अनेक वेळा येऊन भिकारी असल्याचं बनाव रचला होता. अनेक वेळा या महिला अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन या बंगल्यात भीक मागण्यासाठी जात असे. यावेळी गरीब असल्यामुळे बंगल्यातील काहीजण त्यांना अनेक वेळा दुपारी खाणं-पिण द्यायचे. याच गोष्टीचा फायदा घेत या महिलांनी या बंगल्याची रेकी केली.
घरातील सगळेजण बाहेर कधी जातात आणि कधी परततात याची माहिती या महिलांनी जमवली होती. ११ डिसेंबर रोजी या महिलांनी घरात कोणी नसताना घराच्या मागील बाजूने बेडरूममध्ये असलेलं लॉकर तोडून त्यातील दागिने आणि इतर वस्तू घेऊन पळ काढला. घरी परतल्यानंतर फिर्यादी यांना हा सगळा प्रकार निदर्शनास आला आणि त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासता या महिलांचा शोध घेण्यासाठी बीड आणि जालना या ठिकाणी पथकं रवाना केली होती. याप्रकरणी २ महिलांसह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली असून चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीतील १ पुरुष आणि एका महिलेचा शोध पोलिस घेत आहेत.
हेही वाचा दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा
खुशबू गुप्ता, अनु आव्हाड, महावीर चपलोत, मदन वैष्णव असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.