Pune News : यंदा जूनच्या सुरुवातीपासून पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. सध्या धरणांमध्ये एकूण १४.७३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांत धरणांमधील पाणीसाठ्यात १.७३ टीएमसीने वाढ झाली. वाढ होऊनही गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा १.३२ टीएमसीने कमी आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडला. दुसऱ्या आठवड्यात पावसात खंड पडला. त्यानंतर आता मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी पुन्हा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सर्व धरणांमध्ये मिळून उपलब्ध असलेले एकूण पाणी ७.४३ टक्के आहे. गतवर्षीच्या आजच्या तारखेला धरणांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी ८.०९ टक्के इतकी होती. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ०.६६ टक्के इतका पाणीसाठा कमी आहे.
गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा १६.०५ टीएमसी होता. सध्याचा पाणीसाठा १४.७३ टीएमसी आहे. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा १.३२ टीएमसीने कमी झाला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याने आता तळ गाठला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापही उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था खूपच बिकट आहे.
‘टाटां’च्या धरणांत ७.९८ टीएमसी पाणी जिल्ह्यात टाटा उद्योग समूहाची सहा धरणे आहेत. त्यात मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ४२.७६ टीएमसी आहे. यापैकी सध्या ७.९८ टीएमसी (१८.६७ टक्के) उपयुक्त साठा शिल्लक आहे. या सहापैकी लोणावळा धरणात ०.०१ टीएमसी अल्प साठा उपलब्ध आहे.
पवना -१.६२
चासकमा- ०.५३
भामा आसखेड -१.१२
आंद्रा -०.७१
गुंजवणी -०.३६
भाटघर- १.४७
नीरा देवघर- १.०६
वीर -१.८९
माणिकडोह -०.२१
येडगाव -०.६४
डिंभे- ०.१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.