pune dam water level mulshi dam 40 percent water storage monsoon rain weather sakal
पुणे

Mulshi Dam Water Level : मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; ५ टक्‍के असलेला साठा झाला ४० टक्‍के

सकाळ वृत्तसेवा

Mulshi Dam Level Update : मुळशी धरण परिसरात गेल्‍या तीन दिवसांपासून पावसाने पुन्‍हा जोर धरला आहे. पावसाच्‍या जोरदार सरी कोसळत आहेत. सतत सुरु असलेल्‍या जोरदार पावसामुळे मुळशी धरणाच्‍या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे.

ताम्हिणी येथे गेल्‍या चोवीस तासांत ३५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धरणात जूनच्या अखेरीस जेमतेम ५ टक्‍के असलेला साठा सुमारे ४० टक्‍के झाला आहे. मुळशी धरणातील उपयुक्‍त पाणी साठा अत्‍यंत कमी झाला होता.

पाऊस पडत होता, परंतु जोर नव्‍हता. दावडी, ताम्हिणी, पिंपरी, आंबवणे, कुंभेरी, पोमगाव, नांदिवली, शेडाणी, मुळशी, वळणे परिसरात जोरदार पाऊस झाला. गेल्‍या तीन-चार दिवसांपासून पावसाने जोर धरल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. डोंगरांवरून येणाऱ्या पाण्‍याने ओढे, नाले,

धबधबे प्रवाहित होऊन वाहण्‍यास सुरवात झाली आहे. त्‍यांनतर पाणीसाठ्यात वाढ होऊन साठा वाढला आहे. मागील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडत आहे. भातशेतीसाठी अत्‍यंत गरजेचा असलेला पाणी साचेल असा पाऊस होत असल्‍याने शेतकऱ्यांमध्‍ये समाधानाचे वातावरण आहे.

मुळशी धरण परिसरात शनिवारी सकाळी नोंदलेला गेल्‍या चोवीस तासांतील पाऊस मिलीमीटरमध्‍ये (कंसात या हंगामातील एकूण पाऊस) पुढीलप्रमाणे- ताम्हिणी ३५० (२७३३), दावडी ३२० (२७०६), आंबवणे २८० (२४४०), शिरगाव २३० (२३१४ ), मुळशी ८५ (१११२ ), माले ८२ (१०२८ ).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT