pune dam water level rain update today Temghar Varasgaon Panshet Khadakwasla dam storage 10 tmc esakal
पुणे

Pune Dam Water Level : पुण्यातील चार धरणांचा पाणीसाठा १० ‘टीएमसी’वर

अवघ्या २४ तासांत महिनाभराचा साठा जमा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या २४ तासांत चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे १.०४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला महिनाभर पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. दरम्यान, चारही धरणांतील पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून सध्या १०.०९ टीएमसी म्हणजेच ३४.६१ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

सोमवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांत मिळून ९.०५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत १०.०९ टीएमसी पाणीसाठा जमा झाला.

गेल्या २४ तासांत १.०४ टीएमसी पाणी धरणांमध्ये जमा झाले आहे. शहराला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते. त्यामुळे शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा गेल्या २४ तासांत जमा झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरणक्षेत्रात ७५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ४४ मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात ४८ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात नऊ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

मंगळवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे २० मि.मी. आणि १६ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात पाच मि.मी. पाऊस पडला.

चार धरणांतील साठ्याची टक्केवारी

  • टेमघर - ०.७ टीएमसी (२१.१८ टक्के)

  • वरसगाव - ४.५१ टीएमसी (३५.१८ टक्के)

  • पानशेत - ३.८९ टीएमसी (३६.५५ टक्के)

  • खडकवासला - ०.९० टीएमसी (४५.७२ टक्के)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT