pune dam water storage 230 million cubic feet of water less in five days panshet varsgaon temghar khadakwasla monsoon rain  sakal
पुणे

Pune Dam Water Level : धरण साखळीतील पाणीसाठा होतोय कमी...

पाऊस उशिरा आल्याचा परिणाम; शेतीसाठी पाणी कायम

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी पाणीसाठ्यातील वाढ थांबली आहे. कालव्यांतून शेतीला आणि जलवाहिनीतून शहराला पिण्यासाठी पाणी सुरू आहे. यामुळे मागील पाच दिवसांपासून पाणीसाठा आणखी कमी होऊ लागला आहे. पाच दिवसांत २३० दशलक्ष घनफूट पाणी कमी झाले.

यंदा पाऊस बराच उशिरा सुरु झाला. २७ जून रोजी चारही धरणांत सर्वांत कमी पाणीसाठा होता, जो ४.१६ टीएमसी म्हणजे १४.२६ टक्के इतका होता. एक ते २७ जून दरम्यान टेमघरला ३५, वरसगावला ३१, पानशेतला २८ तर खडकवासला येथे ४ मिलिमीटर पाऊस पडला. २७ जूननंतर आजअखेर ९३ दिवसांत धरण साखळीत सर्वात कमी २३.५४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जुलैची सरासरी २.६३ टीएमसी कमी

धरण साखळीत फक्त जुलैत पाणी जमा होण्याची मागील १० वर्षांतील सरासरी ११.०७ टीएमसी आहे. यंदा मात्र या महिन्यात चारही धरणांत मिळून‌ ८.४४ टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. तो सरासरीपेक्षा २.६३ टीएमसीने कमी होता.

ऑगस्टमध्येही कमी पाऊस

यंदा एक ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होत गेला. तो १५ ऑगस्टनंतर आणखी कमी झाला. गेल्या पूर्ण महिन्यात खडकवासला येथे ५९, पानशेतला २२८, वरसगावला २५४ तर टेमघरला ४४३ मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान, ऑगस्टअखेर मागील वर्षीपेक्षा यंदा १.६५ टीएमसी पाणी कमी जमा झाले.

दरम्यान, आजअखेर शहराला पाणीपुरवठा करणारे पानशेत ९९.८५ टक्के आणि वरसगाव ९९.७७ टक्के भरले आहे. खडकवासला धरणात ०.९८ टीएमसी म्हणजे ४९.४२ टक्के पाणीसाठा आहे.

टेमघर धरणात २.९७ टीएमसी म्हणजे ८०.०३ टक्के पाणीसाठा जमा आहे. चारही धरणांमध्ये २७.३७ टीएमसी म्हणजे ९३.८८ टक्के धरण भरलेले आहे.

वीज निर्मिती सुरू

धरण परिसरात सध्या पाऊस नाही. कोकण घाटमाथ्यावरील दऱ्याखोऱ्यांतून ओढ्यात पाणी जमा होते. त्यानंतर ओढे धरणात जमा होतात. धरणातील १०० टक्क्यांपेक्षा जादा पाणी ‌वीज निर्मितीसाठी सोडले जात आहे. वरसगाव धरणातून दोन सप्टेंबरपासून वीजनिर्मितीसाठी धरणातून ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे.

पानशेत धरणातून वीज निर्मितीसाठी तीन सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. दोन्ही धरणातून सोडलेला एकूण विसर्ग १२०० क्यूसेक पाणी हा थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.

यंदा पाणलोट क्षेत्रात व लाभ क्षेत्रात पाऊस कमी आहे. ऑगस्टअखेर धरण पूर्ण भरलेली नाही. धरणातील पाण्याचे वाटप करताना कसरत करावी लागणार आहे. अशीच परिस्थिती २०१५- १६ दरम्यान झाली होती. शहरातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी पाण्याची बचत केली पाहिजे. राष्ट्रीय पाणी धोरणानुसार दुष्काळाची परिस्थिती असताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागते.

- पांडुरंग शेलार, निवृत्त कार्यकारी अधिकारी खडकवासला

यंदा ऑगस्टअखेर चार‌ही धरणांतून २७.६० टीएमसी म्हणजे ९४.६८ टक्के इतका पाणीसाठा होता. हा यंदाच्या मोसमातला जमा झालेला सर्वाधिक पाणीसाठा आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता चारही धरणात मिळून २७.३७ टीएमसी म्हणजे ९३.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील पाच दिवसात २३० दशलक्ष घनफूट पाणी कमी झाले आहे. सध्या धरणातून शेतीसाठी १००५ क्युसेकने कालवा सुरू आहे.

- श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता- खडकवासला पाटबंधारे विभाग

२०१८ पासून ऑगस्ट अखेरचा सर्वात कमी पाणीसाठा

ऑगस्टअखेर चारही धरणात २७.६० टीएमसी पाणी जमा झाले होते. यंदाचा हा पाणीसाठा २०१८ पासूनचा सर्वाधिक कमी पाणीसाठा आहे. मागील वर्षी पाणीसाठा २९.०७ टीएमसी हा सर्वाधिक होता. २०१७ मध्ये २७.३० टीएमसी होता याचा अर्थ फक्त २०१७ पेक्षा ३०० दशलक्ष घनफूट पाणी जादा आहे. तर २०१६ मध्ये २८.७० टीएमसी पाणी जमा होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT