Pune Dangerous Reel
Pune Dangerous Reel sakal
पुणे

Pune Dangerous Reel : रीलसाठी लटकले इमारतीला;कात्रज परिसरातील घटना,तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रील बनविण्यासाठी तरुणी एका तरुणाचा हात धरून एका इमारतीवरून लटकल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच, भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. एका बंद इमारतीच्या छतावरून तरुण-तरुणीने धोकादायकरीत्या रील बनवला आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील कात्रज नव्या बोगद्याजवळील दरी पुलाजवळ या तरुणांनी रील शूट केला आहे. संगनमताने केलेला गुन्हा आणि अविचाराचे किंवा हयगयीचे कृत्य करून दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल तरुणांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका जुन्या इमारतीवर हाताची पकड तपासण्यासाठी एक तरुणी तरुणाचा हात पकडून इमारतीवरून लटकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या दोघांसोबत तीन ते चार व्हिडिओग्राफरदेखील तेथे उपस्थित असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट होते.   रील तयार करण्याच्या नादामध्ये एका तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना नुकतीच छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. कारमध्ये बसून रील बनवत असताना तरुणी कारसोबत दरीत कोसळली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. दौलताबाद परिसरातील सुलीभंजन येथील दत्तमंदिराजवळ ही घटना घडली होती. हा प्रकार ताजा असतानाच अत्यंत धोकादायकपणे रीलचे शूट करण्यात येत असल्याचा प्रकार कात्रज परिसरात घडला.

व्हिडिओत नेमके काय दिसते?

हा व्हिडिओ पुणे-बंगळूर महामार्गाजवळील एका पडीक इमारतीवरून शूट करण्यात आला आहे. या इमारतीवर चढून तरुण आणि तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत. ‘ग्रीप स्ट्रेंथ चेक’ म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे हे तपासण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याचे कॅप्शनमध्ये लिहून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सुमारे दोन ते तीन मजली उंच इमारतीवरून ही तरुणी तरुणाचा हात पकडून अधांतरी लटकत असल्याचे दिसत आहे. हा स्टंट शूट करणारे तरुणदेखील व्हिडिओत दिसत आहेत. पूर्ण तयारीने हे चौघे इमारतीवर चढले होते, तर एक जण खालून शूटिंग करत आहे, असे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अनेकांनी या व्हिडिओवरून संबंधित तरुण-तरुणीवर टीका केली आहे.

या गुन्ह्यात काय शिक्षा होते?

या तरुणांवर भादंवि कलम ३४ आणि ३३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगनमताने केलेला गुन्हा आणि अविचाराचे किंवा हयगयीचे कृत्य करून दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्यानंतर या कलमांनुसार गुन्हा दाखल होत असतो. तीन महिने तुरुंगवास आणि २५० रुपये दंड किंवा दोन्ही असे या गुन्ह्याच्या शिक्षेचे स्वरूप आहे. हा गुन्हा जामीनपात्र असून, त्यात तडजोड करता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT