पुणे - पुणे ते दौंड या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे ते दौंड व दौंड ते पुणे या लोकल सेवा २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने पुणे पोलिसांकडून महापालिकेसह विविध शासकीय विभागांशी संपर्क साधण्यात आला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवरील लॉकडाऊननंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असल्यामुळे शहरातील विविध प्रकारच्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ये-जा करण्याची मात्र गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे ते दौंड व दौंड ते पुणे लोकल सेवा सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली.
लोकल सेवेची वेळ
पुणे ते दौंड : सकाळी सहा वाजता व सायंकाळी ५.२० मिनिटांनी
दौंड ते पुणे : सकाळी पावणे आठ व सायंकाळी सव्वा सात वाजता
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ई-पाससाठीची नोंदणी
कर्मचाऱ्यांनी www.punepolice.gov.in या लिंकवर जाऊन ई-पास मिळण्यासाठी आपल्या कार्यालयाचे पत्र, ओळखपत्र, छायाचित्र, फिटनेस सर्टिफिकेट व इतर माहिती अर्जदाराने ऑनलाइन भरून द्यायची आहे. पोलिस आयुक्तालयामार्फत संबंधित अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जदाराला प्रवासासाठीचा क्यूआर कोड आधारित ई-पास उपलब्ध होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.