सुर्या लाॅज sakal
पुणे

दौंड - सुर्या लाॅजवर खुलेआम वेश्याव्यवसाय; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील खडकी येथील पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सुर्या लाॅजवर खुलेआम वेश्याव्यवसाय चालू असतानाही स्थानिक पोलिसांकडून राजकीय वरदहस्त व अर्थपूर्ण संबंधामुळे कारवाई होत नव्हती. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशावरून पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने सुर्या लाॅजवर शनिवारी ( ता. 9 ) रात्री छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी महिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकी येथील पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या सुर्या लाॅजवर खुलेआम वेश्याव्यवसाय केला जात असतानाही या व्यवसायात खडकी येथील काही राजकीय मंडळींची भागीदारी असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याने व अर्थपूर्ण संबंधामुळे स्थानिक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. मात्र कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबाबतची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना मिळाल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखालील पुणे गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे व सहकाऱ्यांनी शनिवारी ( ता. 9 ) रात्री खडकी येथील सुर्या लाॅजवर छापा टाकून लाॅजचालकाडून आपल्या आर्थिक फायदा व उपजीविकेसाठी सहा महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे पोलिस पथकाच्या निदर्शनास आले.

यासंदर्भात गुन्हे अन्वेषण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कांडगे यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या सहा महिलांना ताब्यात घेण्यात आले. या महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या लाॅजचालक रविश शेट्टी सध्या राहणार सुर्या लाॅज खडकी ( मूळ रा. मेलासूर , ता. कुंदापूर, जि. उडपी कर्नाटक) सुनील जामगे, बब्बीशेठ, सोनू ( पूर्ण नाव व पत्ता नाही ) या चार जणांविरूध आर्थिक फायदा व उपजिवेकेसाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या वेश्याव्यवसाय चालू असलेल्या लाॅजमध्ये भागीदार असलेले खडकी येथील स्थानिकांना राजकीय वरदहस्तामुळे गुन्हयातून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

छाप्यात पोलिसांनी रोख 29 हजार 200 रूपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हाचा तपास करीत असलेले दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना याबाबत विचारले असता त्यांनी यापूर्वी सुर्या लाॅजवर वेश्याव्यवसायप्रकरणी दोन वेळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा लाॅज कायमस्वरूपी सील करण्यात येणार असल्याची माहिती घुगे यांनी दिली.

कुरकुंभ, पांढरेवाडी हद्दीतील पुणे - सोलापूर महामार्गाच्या लाॅजवर कारवाई व्हावी. दौंड - कुरकुंभ रस्त्यालगतच्या गोपाळवाडी हद्दीतील एक हाॅटेल व लाॅज दौंड पोलिस चौकीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने भागीदारीत चालवण्यास घेतले असून याठिकाणी खुलेआम वेश्याव्यवसाय चालू आहे. मात्र सदर चालक व्यक्ती पोलिस कर्मचारी म्हणून दौंड चौकीत कार्यरत असल्याने कारवाई होत नाही. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी परिसरातील महिला व ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT