jee sakal
पुणे

Pune : जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज भरण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (एनटीए) वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता दोन सत्रात जेईई मेन परीक्षा घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (एनटीए) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील पहिल्या सत्रातील जेईई मेन परीक्षा जानेवारी २०२४मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत दिली आहे. पहिल्या सत्रातील जेईई मेन परीक्षा २४ जानेवारी आणि १ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (एनटीए) वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता दोन सत्रात जेईई मेन परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील पहिल्या सत्रातील परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये, तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. देशातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी), केंद्र सरकारमार्फत अनुदानित तंत्रज्ञान संस्था, यांसह नामांकित संस्था,

विद्यापीठांमध्ये बी.ई आणि बी.टेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा घेण्यात येते. जानेवारीत होणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरवर्षी देशभरातून जवळपास नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. जानेवारी होणाऱ्या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

जेईई मेन परीक्षा १३ भाषांमध्ये घेण्यात येते. यामध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम्‌, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही सत्रातील परीक्षा देण्याचा पर्याय खुला असणार आहे.

परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

- www.nta.ac.in

- https://jeemain.nta.ac.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT