नदीपात्रातील जलपर्णी काढताना कामगार. sakal
पुणे

Pune : नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

पाटबंधारे विभागामार्फत भीमा नदीच्या पात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे, वढू,

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : पाटबंधारे विभागामार्फत भीमा नदीच्या पात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे, वढू, पेरणे, बुर्केगाव, सांगवी सांडस येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने १५ एप्रिल २०२३ नंतर सदर बंधारे पाणी सोडून रिकामे करण्यात येणार आहेत. फक्त नदीपात्राबरोबर पाणी ठेवण्यात येणार आहे.

संबंधित गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी आपल्या स्तरावर भीमा नदीच्या दोन्ही तीरावरील खाजगी जलउपसा पंप धारक शेतकऱ्यांना कळवून पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन करावे असे शिक्रापूर येथील कोंढापुरी पाटबंधारे शाखेचे शाखा अधिकारी रा.मा. आहेर यांनी पत्राद्वारे ग्रामपंचायतींना कळविले आहे.

दरम्यान, या संदर्भात सध्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असून, बंधाऱ्याची दुरुस्ती नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर करण्यात यावी आणि पाणीटंचाई दूर करण्यासाठी योग्य नियोजन करावे अशी मागणी शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे यांनी शिक्रापूर येथील पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी श्री आहेर यांना निवेदनाद्वारे कळविले आहे आहे.

शेतकरी संघटनेतर्फे निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या उन्हाळ्यामुळे भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. शेती व पिण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरत आहे. तसेच या बंधार्‍यावरील पाण्यावर नदीकाठच्या अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत तसेच अनेक शेतकऱ्यांच्या खाजगी व सार्वजनिक उपसा जलसिंचन योजना आहेत. शेती व पिण्यासाठी नदीपात्रातील पाण्याची नितांत गरज आहे.

नदीपात्रातील हे पाणी सोडून दिले तर बंधारे कोरडे पडून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. बंधारे दुरुस्त झाल्यानंतर पुढील पाण्याचे आवर्तन केव्हा येईल याची शाश्वती नाही. तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT