Pune development suffers due to lack of vision Narendra Modi criticizes Congress politics  sakal
पुणे

PM Narendra Modi : दूरदृष्टीच्या अभावामुळे पुण्याच्या विकासाला फटका; नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘महाराष्ट्रात अन्य पक्षांचे सरकार असताना मेट्रो, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, सिंचन यासह अनेक प्रकल्प रखडले होते. पूर्वीच्या काळातील सरकारचे जुने विचार आणि दूरदृष्टीचा अभावामुळे शहरांच्या विकासाचे नियोजन झाले नाही. या सरकारला मेट्रोचा एकही पिलर उभारता आला नाही.

त्याचा फटका महाराष्ट्राला आणि पुण्याला बसला आहे. एकनाथ शिंदे यांचे डबल इंजिन सरकारमुळे प्रकल्पांची गती वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विकासाला प्राधान्य देणारे सरकार निरंतर सत्तेत असणे आवश्‍यक आहे, अशा शब्दात काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन केले.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन, बिडकीन औद्योगीक प्रकल्पाचे उद्‍घाटन, स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो, भिडे वाडा स्मारकाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘पुणे हे शहरी विकासचे केंद्र बनणे गरजेचे आहे. पुण्याची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या लोकसंख्येमुळे शहराच्या विकासाची गती कमी न करता उलट सामर्थ्य बनली पाहिजे. शहराचा विस्तार झाला तरी सर्व भाग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडले गेले पाहिजेत याच विचाराने महायुती सरकार दिवसरात्र काम करत आहे.

पुण्याची गरज लक्षात घेऊन मेट्रो सेवा खूप आधी सुरु होण्याची गरज होती. पण गेल्या काही दशकात शहरी विकासामध्ये नियोजन आणि दूरदृष्टी नसल्याने प्रकल्पांची फाइल मंजूर हो नसत, मंजूर झाली तरी प्रकल्प अनेक वर्ष पूर्ण होत नसते.

त्यामुळे देशाचे, महाराष्ट्राचे आणि पुण्याचे मोठे नुकसान झाले आहे. २००८ पासून पुणे मेट्रोची केवळ चर्चा सुरू होती पण आमच्या सरकारने २०१६ मध्ये मेट्रोचे भूमिपूजन, आज पुणे अत्याधुनिक मेट्रोचा वेग आणि विस्तार वाढला आहे.

आजच्या कार्यक्रमात जुन्या कामाचे उद्‍घाटन केलेच पण सोबतच नव्या कामाचे भूमिपूजनही केले आहे. जुने विचार व कार्यपद्धती असती यातील एकही काम पूर्ण झाले नसते. मागच्या सरकारला आठ वर्षात मेट्रोचा एकही पिलर उभा करता आला नव्हती, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.

महिलांसाठी जुनी मानसिकता अन् व्यवस्था बदलली

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण गाठताना आपल्याला परंपरांना सोबत घेऊन जायचे आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा निर्माण करताना त्याचा लाभ प्रत्येक वर्गास, समाजाला मिळाला पाहिजे. समाजात बदल घडविण्याची जबाबदारी जेव्हा महिला घेते तेव्हा काय क्रांती घडते हे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून महाराष्ट्राने बघितले आहे.

त्यांनी मुलींची पहिली शाळा केलेल्या भिडे वाड्याचे संवर्धन करणे आपले कर्तव्य असून, हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे असेल. स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना शिक्षण घेता येत नव्हते. त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. स्वातंत्र्यानंतरही महिलांना संधी न देण्याची मानसिकतेतून देश स्वतंत्र झाला नाही.

पूर्वीच्या सरकारच्या काळात शाळेत स्वच्छतागृह नसल्याने मुलींना शिक्षण सोडावे लागत होते. सैनिकी शाळा, लष्करात महिलांना प्रवेश नव्हता, गरोदरपणाची सुट्टी मिळत नसल्याने नोकरी सोडावी लागत होती. पण आमच्या सरकारने जुनी मानसिकता व व्यवस्था बदलून टाकली. सर्व क्षेत्रात महिलांना संधी दिली. नारी शक्ती अधिनियमातून महिलांना सुरक्षेची गॅरंटी दिली. महिलांना सर्व क्षेत्राचे संधी दिल्याने देशाच्या विकासाचे दरवाजे उघडले आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतरीत्या जनसुराज्य या राजकीय पक्षाचे लाँचिंग; पहिल्या अध्यक्षांबाबत जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाची सुरूवात होणार, जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करावी?

Thane Fire News: ठाण्यात भीषण आग, आगीत दोन सिलिंडरचा स्फोट

Ajit Pawar : कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अजित पवार गुरुवारी बारामतीत पोलिस अधिकाऱ्यांची घेणार बैठक

Latest Marathi News Live Updates : ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी

SCROLL FOR NEXT