Ajit Pawar Esakal
पुणे

Pune News: अजित पवारांच्या खुर्चीत त्यांचाच विश्वासू, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नवी निवड

अंकिता खाणे (Ankita Khane)

रणजीत तावरे यांची पुणे जिल्हा बॅंकेचे नवे संचालक पदी निवड झाली आहे. अजित पवार यांच्या जागी तावरे यांची निवड झाली आहे. रणजीत तावरे माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. प्रतिभा पतसंस्था आणि राजहंस दुध उत्पादक संघाचे ते अध्यक्ष आहेत. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.

काही दिवसांपुर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अजित पवारांनी राजीनामा दिलेला होता. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. तर अजित पवारांच्या जागेवर त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रणजित तावरे यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

रणजित तावरे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला जरी असला, तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: केंद्र सरकारने दिली दिवाळी भेट! महागाई भत्ता वाढवून सरकारी कर्मचाऱ्यांना केले खूश; किती वाढणार पगार?

Share Market Closing: शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच; सेन्सेक्स 300 अंकांनी खाली, निफ्टीही 25,000 अंकांवर बंद

Nashik Hospital Newborn Swap : जन्माला आला मुलगा अन् हातात दिली मुलगी... नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रकाराने खळबळ

Baba Siddiqui: मला गोळी लागलीये आता...; बाबा सिद्दिकींचे अखेरचे शब्द काय होते? कार्यकर्त्यांने सांगितला 'तो' प्रसंग

धक्कादायक! Mobile वर सुरु असलेली मालिका बंद केल्याने मुलाने आईवर केला कात्रीने हल्ला; खिडकीच्या फोडल्या काचा अन्..

SCROLL FOR NEXT