वालचंदनगर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीचे बिगुल वाजले असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज बुधवार (ता. १) रोजी शक्तीप्रदर्शन करीत ‘ ब ’ वर्गातून उमेदवारी अर्ज भरला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. बॅंकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक होत असून २ जानेवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. २९ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. जिल्हाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या पीडीसीसी बॅकेवरती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे गेल्या २५ वर्षापासून संचालक म्हणून कार्यरत आहेत.तसेच त्यांनी जिल्हा बॅकेच्या अध्यक्षपदाची धुरा संभाळली होती. भरणे हे गेल्या अनेक वर्षापासून ‘ ब ’ वर्गातून निवडणूक लढवत असून त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
इंदापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे व राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘ ब ’ वर्गासाठी पणन व कृषी संबधीतील सहकारी संस्थाचे प्रतिनिधी मतदान करतात. जिल्हामध्ये सुमारे ९० मतदार आहेत. जिल्हा बॅकेवरती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,आमदार संजय जगताप, जिल्हा बॅकेंचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रवीण तुपे, जयदीप काळभोर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,नवनाथ रुपनवर, प्रशांत पाटील उपस्थित होते. प्रवीण तुपे हे सुचक उमेदवारी अर्जासाठी सुचक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.