cng gas pump sakal
पुणे

CNG Gas : ‘सीएनजी’च्या तुटवड्यामुळे वाहनधारक गॅसवर; दर वाढल्याने चालकांसमेर दुहेरी संकट

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण होत आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण होत आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

इंदापूर - एकीकडे पेट्रोल, डिझेलप्रमाणे सीएनजीच्या दरानेही ८५ पार केलेली असताना दुसरीकडे पंपावर सीएनजीचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने इंधन तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनधारकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहन चालकांना सीएनजी पंपावर कधी लांबच्या लांब रांगांमुळे वेळेच्या अपव्ययासह तर कधी गॅस नसल्याने पंप बंद असल्याने मानसिक त्रास सोसावा लागत आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सीएनजी पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण होत आहे. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्याने पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे वाहनचालकांचा वेळेच्या अपव्ययासह मानसिक त्रास ही सहन करावा लागत असल्याने सीएनजी वाहनधारकच गॅसवर आहेत.

इंदापूर शहरातील व पुणे सोलापूर मार्गावरील दोन्ही ठिकाणी सीएनजी पंप असल्याने चालकांची धावपळ उडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच लोक सीएनजी पंपावर वाट पाहात चक्क झोपा काढत असल्याचे चित्र आहे.

पेट्रोल, डिझेलप्रमाणेच मध्यंतरी एखादा कमी झालेला अपवाद वगळता सीएनजीच्या दरात वाढ होत आहे. तसेच सीएनजीचा तुटवडा देखील जाणवत आहे. पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. सीएनजी मिळत नसल्याने अनेक वाहन चालकांवर वाहन बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

मागील काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा पुरवठा मागणी प्रमाणे सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. ज्या पंपावर गॅस उपलब्ध होत आहे. तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. बऱ्याच वेळा रांगेत थांबूनही गॅस संपल्यावर वाहन चालकांना गॅसविनाच वाहन परत माघारी फिरवावे लागत आहे. याबाबत पुरवठा कंपनीकडून उपाययोजना होण्याची मागणी वाहनधारकांसह पंपचालकांमधून होत आहे.

अपघाताला निमंत्रण

इंदापूर शहरातील सीएनजी पंपावर वाहनांच्या रांगा लागल्यानंतर पुणे सोलापूर महामार्गावर लांब पर्यंत येतात. परिणामी वाहतुकीची कोंडी तर होतेच त्याचबरोबर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत आहेत. तर भविष्यात मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. याबाबत पंप मालक यांना विचारले असता हा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

पंपचालकांकडूनही अडवणूक

सीएनजीच्या पुरवठादार कंपनीकडून पुरवठा होत नसल्याने गॅस उपलब्ध होत नाही तसेच ज्यावेळी उपलब्ध होतो त्यावेळी काही पंपांवर दोन दोन पॉइंट असताना एकच पॉइंट चालू ठेवला जातो. यामुळेही वाहनधारकांची गैरसोय होते. त्याचा परिणाम तेथे गर्दी वाढत जाते आणि वेळ ही लागतो.

सहा पंप पण रांगा सर्वत्र

इंदापूर तालुक्यात सीएनजीचे पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण, डाळज, इंदापूर शहरात व इंदापूर बाह्यवळण मार्गावर एक असे चार पंप आहेत. तर इंदापूर बारामती मार्गावर ५४ फाटा व लासुर्णे येथे प्रत्येकी एक असे एकूण सहा पंप आहेत. बारामतीकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन्ही पंप वगळता पुणे सोलापूर महामार्गावरील चारही पंपावर वाहनधारकांना तासनतास ताटकळत रांगेत उभे राहावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT