Pune sakal
पुणे

Pune : बारामतीच्या जि. प. शाळेत आढळला दारू ढोसून झिंगलेला गुरुजी! गटशिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली

गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली होती.

सकाळ डिजिटल टीम

Pune - तरडोली (ता. बारामती) ग्रामपंचायतअंतर्गत भोईटेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका गुरुजीने आज चक्क दारू पिऊन टेबलावरच ताणून दिली होती. जागरूक नागरिकाने अचानक शाळाभेट केल्याने त्याची मद्यधुंद अवस्था समोर आली. याबाबतचा व्हिडिओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत 25 विद्यार्थी शिकत आहेत. शाळा सुरू होऊन 15 दिवसही झाले नाहीत आणि शिक्षक भरत चव्हाण यांनी आपले अवगुण दाखवायला सुरुवात केली. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. मात्र आपले कोणीच वाकडे करू शकत नाही या भ्रमाने चव्हाण याने संधी वाया घालवली आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद झिंगलेला गुरुजी पहावा लागला.

आज ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी व त्यांचे सहकारी सतीश भापकर अचानक शाळा भेटीसाठी गेले. यावेळी मुख्याध्यापक अशोक जगदाळे यांनी सगळी मुले एकाच वर्गात घेऊन शिकवण्याचे काम सुरू ठेवलेले होती. दुसऱ्या वर्गात चौधरी गेले तर भरत चव्हाण हा शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून मस्तपैकी झोपी गेला होता. चौधरी यांनी त्यांना अनेक हाका मारल्या तेंव्हा कुठे ते जागे झाले.

मात्र ते भरपूर दारू प्यायल्याने तर शुद्धीत नाहीत हे चौधरी यांच्या लक्षात आले. अखेर चौधरी यांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक चव्हाण यास मिटवून घेऊ असे शब्द वापरत पाठीशी घालताना दिसत आहेत. तर चव्हाण हा चालण्याच्या आणि बोलण्याच्याही अवस्थेत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच तो लागले आहे, आजारी आहे असा बनावही करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

विद्यार्थी गेले वर्षभर याला सहन करत असल्याची चर्चा आहे. बारामतीसारख्या तालुक्यात अशी घटना समोर आल्याने जोरदार चर्चा झडत आहे. असे अनेक शिक्षक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये असून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. पालकांनी विद्यार्थीहित डोळ्यापुढे ठेवून संतोष चौधरी यांच्याप्रमाणे दक्ष रहावे असे मत व्यक्त होत आहे. गुणी शिक्षकही या प्रकाराने अस्वस्थ आहेत.

संतोष चौधरी म्हणाले, गरिबांची मुले या शाळेत शिकतात त्यांना चांगले शिक्षण मिळावे इतकी साधी अपेक्षा आहे. मात्र चव्हाण यांना सुधारण्यासाठी आम्ही विनंती करत होतो. आज दारू पिऊन झोपल्याचा पुरावाचा आम्हाला सापडला. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी न्यायचे होते मात्र ते निघून गेले. शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन आम्हाला चांगले शिक्षक द्यावेत.

गटशिक्षणाधिकारी संपत गावडे म्हणाले, संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. उद्याच अहवाल येईल. वैद्यकीय तपासणीही होईल. जे येईल त्यावर कडक कारवाई होईल. मुख्याध्यापकाला देखील नोटीस बजावली आहे. गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेस कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT