पुणे - पुणे विभागातील धरणांमध्ये आजअखेरपर्यंत (ता. १२) एकूण ३१७.७२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण ७७.८३ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या या तारखेला या धरणांमधील एकूण पाणीसाठा हा ३९७.३५ (९७.३४ टक्के) इतका होता.
त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा विभागातील धरणांमध्ये ७९.६३ टीएमसी पाणी कमी असल्याचे जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणांमधील पाणीसाठा आकडेवारी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या विभागात एकूण ३८ धरणे असून, या सर्व धरणांमधील एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ही ४०८.२२ टीएमसी इतकी आहे. पुणे विभागातील प्रमुख धरणांमध्ये कोयना, उजनी, टेमघर, वरसगाव, पानशेत, पवना, चासकमान, भाटघर, नीरा देवघर, डिंभे, धोम, कण्हेर, उरमोडी, वारणा, राधानगरी, दूधगंगा आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील मुठा खोऱ्यांतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांची मिळून एकूण पाणी साठवण क्षमता ही २९.१५ टीएमसी इतकी असून, आजअखेर या चार धरणांमध्ये २७.४२ टीएमसी पाणी साठले आहे.
नीरा खोऱ्यातील १७ धरणांची पाणी साठवण क्षमता ही ४८.३३ टीएमसी असून प्रत्यक्षात या धरणांमध्ये ४२.९७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. कुकडी खोऱ्यातील सात धरणांची पाणी साठवण क्षमता ही ३५.३४ टीएमसी इतकी असून, प्रत्यक्षात २६.६० टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे.
प्रमुख धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
(कंसात पाणीसाठ्याची टक्केवारी)
- टेमघर --- २.९५ (७९.६२ टक्के)
- वरसगाव --- १२.७७ (९९.५५)
- पानशेत --- १०.६५ (१०० टक्के)
- खडकवासला --- १.०५ (५३.१२)
- पवना --- ८.५१ (१०० टक्के)
- चासकमान --- ७.५८ (१०० टक्के)
- भामा आसखेड --- ७.४२ (९६.७६)
- भाटघर --- २२.७१ (९६.६२)
- नीरा देवघर --- ११.७३ (१०० टक्के)
- वीर --- ५.२३ (५५.५७)
- माणिकडोह --- ७.१७ (७०.५०)
- डिंभे --- १२.४० (९९.२८)
- उजनी --- १२.११ (२२.६०)
- धोम --- ८.८८ (७५.९५)
- कोयना --- ८२.६३ (८२.५१)
- वारणा --- २२.६६ (९६.७८)
- राधानगरी --- ७.६१ (९७.९९)
- दूधगंगा --- २१.३९ (८९.१८)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.