Drug Case esakal
पुणे

Pune Drug Case: पुण्यात काय चाललंय? लोहगावातून तब्बल इतक्या कोटींचे मेफेड्रोन केले जप्त

Pune Crime News: या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune Crime News

पुणे : अमली पदार्थ विभागाने लोहगाव परिसरात छापा टाकून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट परिसरात ही कारवाई करण्यात आली. साधारण अर्धा किलो मेफेड्रोनचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी या कारवाईत श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिष सुभाष आबनावे यांना अटक केली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदजे, आबनावे आणि बेंडे यांच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ते मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाच्या छापा टाकला.

काही महिन्यांपूर्वी ससून रुग्णालयाजवळ तब्बल दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन सापडले होते. तेव्हापासूनच सातत्याने पुण्यात अमली पदार्थ आढळून येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT