FC Road L3 Pub Esakal
पुणे

Pune Drugs Case: एल थ्री पबवर महापालिकेचा हातोडा, शहरातील 26 बार अन् पब्जवर कारवाई

FC Road L3 Pub: शहरातील पब, बारमध्ये नियमांचे उल्लंघन होत असून, पहाटेपर्यंत तेथे पार्ट्या सुरु आहेत. त्यातच पबमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये तरुणांकडून अंमली पदार्थ्यांचे सेवन केले जात असल्याचे समोर आले आहे.

ब्रिजमोहन पाटील @brizpatil

गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) लिक्विड लेझर लाउंज (एल थ्री) पबवर आज (ता. २५) महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली. कोणतीही परवानगी न घेता इमारतीमध्ये केलेल्या अंतर्गत बदलांमुळे हे बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकण्यात आले. त्यासह शहरातील अन्य रुफटॉप, बार, पब सह एकूण २६ ठिकाणी कारवाई करून सुमारे ३६ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात आले आहे.

शहरातील पब, बारमध्ये नियमांचे उल्लंघन होत असून, पहाटेपर्यंत तेथे पार्ट्या सुरु आहेत. त्यातच पबमध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये तरुणांकडून अंमली पदार्थ्यांचे सेवन केले जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात पबमध्ये दारू पिऊन अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे ही महागडी गाडी चालवून दोघांचा बळी घेतला. त्यानंतर पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महापालिकेतर्फे कारवाई सुरु असल्याने पबचालकांचे धाबे दणाणले आहेत. हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत फर्ग्युसन रस्त्यावरील एल थ्री पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरु होती. त्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणात पोलिसांचे निलंबन झाले असून, पब चालक भागिदारांना अटक झाली आहे. विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारला या प्रकरणात विरोधकांच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कारवाईचा बडगाही उचलला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पबवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आज महापालिकेच्या बांधकाम विभागाने एल थ्री पबमधील बेकायदेशीर बांधकाम पाडून टाकले आहे. ही कारवाई सुरु असताना फर्ग्युसन रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली झाली होती. त्याच प्रमाणे वडगाव बुद्रूक येथील हॉटेल द अर्बन हारवेस्ट, खराडीतील ७ अ रेस्टॉरंट, माफिया बार, स्पाईन फॅक्टरी, आयन बार बालेवाडी हायस्ट्रीट, द अर्बन फँड्री, टेटूलिया बेरिस्टो, नबाब एशिया, बटर अँड बार, हॉटेल ग्रीन सिग्नल, सुप्रिम स्नॅडविच कॉर्नर जंगली महाराज रस्ता, चैतन्य पराठा, हॉटेल वैशाली यासह २९ ठिकाणी कारवाई करून ३६ हजार ८४५ चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकण्यात आले आहे.

अन् पोलिस बंदोबस्त मिळाला

महापालिकेला अतिक्रमण काढण्यासाठी, अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई करता येत नाही. मात्र एल थ्री पब प्रकरणानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पोलिसांनाच अनधिकृत पब पाडून टाका असे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणल्याने आज महापालिकेकडे पोलिसांनी स्वतःहून पोलिस बंदोबस्त देऊन शहरात कुठे कुठे कारवाई करायची आहे सांगा अशी मागणी केली. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही वेगळा अनुभव आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT