Pune Drugs Case news in marathi esakal
पुणे

Pune Drugs Case: पुण्यात ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला जबाबदार कोण? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? पोलिसांचे निलंबन होणार?

Sandip Kapde

पुण्यातील ड्रग्ज प्रकरण साम टीव्हीने उघड केल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. पोर्शे प्रकरणानंतरदेखील हॉटेल पहाटेपर्यंत सुरू कसे राहतं, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता सर्व यंत्रणा एफसी रोडवरील हॉटेलमध्ये पोहोचल्या आहेत. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतरही पुण्यातील ड्रग्ज प्रकरण संपत नाहीये असे दिसत आहे. एफसी रोडसारख्या गजबजलेल्या ठिकाणावरील हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले की, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे.

"हॉटेलचा मालक आणि चालक सोडून द्या, पण हॉटेल पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू कसे राहिले हा प्रश्न आहेच. तसेच, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे. पुण्याच्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या घटनांना सहन केले जाणार नाही," असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, "जिथे ड्रग्ज सापडले तिथे कठोर कारवाई करण्यात येईल. आम्ही महाराष्ट्राला ड्रग्ज मुक्त करू."

दरम्यान, पुण्यातील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर संपूर्ण प्रशासन जागे झाले आहे. गस्तीवरील पोलिसांवर देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी साम टीव्हीला दिली आहे. फॉरेन्सिक पथक देखील ड्रग्ज पार्टी झालेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.

साम टीव्हीने उपस्थित केलेले सवाल

  1. ड्रग्जचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली का?

  2. कल्याणीनगरच्या घटनेनंतर देखील पोलीस सजग नव्हते का?

  3. पुण्यात हॉटेल्समध्ये रात्रभर पार्ट्या रंगतात कशा?

  4. पुण्यात ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला जबाबदार कोण?

  5. घटनेसाठी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन होणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता; बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला

Dombivali Traffic : डोंबिवलीत अभूतपूर्व वाहन कोंडी; 5 मिनिटांच्या प्रवासासाठी लागला तासभर

Viral: 'मला तुरुंगात पाठवा, माझ्याकडे...', व्यापारी GST कार्यालयात गेला, अधिकाऱ्यांसमोरच अर्धनग्न होत छेडलं आंदोलन, कारण काय?

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE Updates: गुलिगत धोकाने करून दाखवलं! सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

SCROLL FOR NEXT