Pune Drugs Case marathi news
Pune Drugs Case marathi news esakal
पुणे

Pune Drugs Case: पुण्यात ड्रग्ज पार्टी झालेले एफसी रोडवरील हॉटेल कोणते? दोन जण ताब्यात

Sandip Kapde

Pune Drugs Case marathi news

पुण्यातील एफसी रोडवरील लिक्विड लीजर हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई केली आहे. या प्रकरणात हॉटेल मॅनेजरसह एकाला ताब्यात घेण्यात आले असून हॉटेल सील करण्याची तयारी सुरु आहे. या सर्व प्रकरणामुळे पुण्यातील ड्रग्ज व्यसनाच्या वाढचा विळखा समोर आला. प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची तयारी दाखवली आहे. साम टिव्हीच्या बातमीनंतर संपूर्ण प्रशासन जागं झालं आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतरही चालूच-

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर देखील पुण्यातील ड्रग्ज प्रकरणे थांबली नाहीत. एफसी रोडसारख्या वर्दळीच्या ठिकाणावरील लिक्विड लीजर लाउंजच्या बाथरुममध्ये ड्रग्ज पार्टी चालू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पोलिसांची त्वरित कारवाई-

या प्रकरणानंतर पुणे पोलिसांचे पथक तात्काळ हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, हॉटेल सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गस्तीवरील पोलिसांवर देखील कारवाई केली जाईल.

राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया

मुरलीधर मोहळ-

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहळ यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, हॉटेल पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू कसे राहिले हा मोठा प्रश्न आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी त्यांची मागणी आहे. "पुण्याच्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या घटनांना सहन केले जाणार नाही," असे मोहळ म्हणाले.

सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर-

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पोलिसांवर आणि प्रशासनावर टीका करताना, "पुण्यात ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला जबाबदार कोण?" असा सवाल उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, जिथे ड्रग्ज सापडले तिथे कठोर कारवाई करण्यात येईल. "आम्ही महाराष्ट्राला ड्रग्ज मुक्त करू," असे ते म्हणाले. फॉरेन्सिक पथक देखील ड्रग्ज पार्टी झालेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहे.

महत्त्वाचे मुद्दे-

ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ: एफसी रोडवरील लिक्विड लीजर हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ व्हायरल.

ताब्यात घेणे: हॉटेल मॅनेजरसह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सीसीटीव्ही फुटेज: हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात.

मुख्यमंत्र्यांची घोषणा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राची घोषणा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT