Pune - बारामती स्पोर्ट्स फौंडेशनचे सदस्य राहुल पाटील (इंडियन रेल्वे सर्विसेस्) , तुषार चव्हाण (इंडियन फॉरेस्ट सर्विसेस्) , राहुल मोकाशी (इंजिनिअर) , मच्छिंद्र आटोळे (ग्रामसेवक) , सादिया सय्यद (अल्ट्रा रनर , इंजिनिअर) , अजिंक्य साळी (क्रीडा शिक्षक) आणि वैष्णवी ननवरे (आर्किटेक्ट) या सदस्यांनी निर्धारित 16 तासात 4 कि.मी. पोहणे, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42 कि.मी. धावणे हे टास्क सलग पार करून आयर्नमॅन किताबाला गवसणी घातली. संस्थापक अध्यक्ष व ट्रिपल आयर्नमॅन सतीश ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांनी यश मिळविले.
उद्योजक आर.एन. शिंदे, फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ.हेमंत मगर, प्रशांत नाना सातव, रोहित सराफ. राजू भिलारे यांचे सहकार्य या मोहिमेला मिळाले. या स्पर्धेत वैष्णवी ननवरे हिने 18 ते 24 वयोगटात महिलात प्रथम क्रमांक मिळविला.
जागतिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली असून अमेरिकेतील कोना येथे होणा-या जागतिक आर्यनमॅन स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. रजनीश गायकवाड याने याच वयोगटात पुरुषात द्वितीय क्रमांक मिळविला. सादिया सय्यद हिने 30 ते 34 वयोगटात तृतीय क्रमांक पटकाविला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.