Pune Elections 56 boards across country  sakla
पुणे

Pune : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५६ बोर्डांच्या निवडणूका जाहीर

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह आदी महत्वाच्या महापालिकांची मुदत संपल्याने सध्या प्रशासक बसविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी - राज्यातील महापालिका निवडणुकाबाबत कोणतीही हालचाल सुरू नसताना पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील ५६ बोर्डांच्या निवडणूका संरक्षण मंत्रालयाने आज जाहीर केल्या आहेत.

या राजपत्रानुसार ३० एप्रिल रोजी निवडणूक घ्यावी असा आदेश देण्यात आला आहे. याबाबत आज शनिवारी सुट्टी असताना विशेष राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा २००६ च्या अधिनियम ४१ च्या आधारे ही निवडणूक होणार आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह आदी महत्वाच्या महापालिकांची मुदत संपल्याने सध्या प्रशासक बसविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशातील ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे.

नोव्हेंबर २०२१ बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. आतापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा मुदतवाढ मिळेल असे सगळ्यांना अपेक्षा असताना अचानक निवडणूक जाहीर झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी दुपारी अचानक बाबत सोशल मीडियावर निवडणूक जाहीर झाल्याची चर्चा सुरू झाली. सगळीकडे एकच गोंधळ उडाला याबाबत सत्यता तपासण्यासाठी बोर्डातील अधिकारी आणि सभासद यांना नागरिकांनी फोन करून चौकशी केली.

अखेर राजपत्र प्रसिद्ध झाल्यावर निवडणूक बाबत सगळ्यांचीच खात्री पटली आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले .पुणे कॅन्टोन्मेंटसह अनेक बोर्ड महानगरपालिकेत समाविष्ट होणार असल्याच्या बातम्या येत असतानाच अचानक निवडणुका जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली.

कारण बोर्डातील कडक नियमांमुळे अनेक समस्या वर्षानुवर्षे 'जैसे थे' आहेत. नागरिकांना अपेक्षा होती की महानगरपालिकेमध्ये गेल्यावर त्यांना विविध सुविधा, सरकारी योजनांचा लाभ मिळेल तसेच बोर्डाचे नियम शिथिल होतील परंतु असे काहीच न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सचिन मथुरवाला, उपाध्यक्ष पुणे कॅन्टोमेंट बोर्ड

अचानक निवडणूक जाहीर झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पुणे कॅन्टोन्मेंट महानगरपालिकेत समाविष्ट झाले असते तर येथील नागरिकांना सरकारी सुविधाचा लाभ घेता आला असता तसेच येथील घरे बांधणी बाबत असलेले नियम शिथिल झाले असते.

तसेच बोर्डाकडे निधी उपलब्ध नसल्याने नवीन सदस्य निवडुन आला तरी त्याला कामाची खूप कमी संधी आहे. केंद्र सरकारकडे जीएसटीचे पैसे अडकल्याने बोर्डाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यात निवडणूक होणार असल्याने अधिक गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ही धारणा चुकीची; लगेच नवीन सरकार अस्तित्वात येणे बंधनकारक नाही, यापूर्वी 'इतक्या' वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर शपथविधी

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

SCROLL FOR NEXT