पुणे शहर व परिसरातील इलेट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील उद्योगांची वेळ आणि पैशांची बचत होऊन त्यांना आधार ठरू शकेल, असे इलेट्रॉनिक्स क्लस्टर भोसरीत कार्यान्वित झाले आहे.
पुणे - शहर व परिसरातील इलेट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील उद्योगांची वेळ आणि पैशांची बचत होऊन त्यांना आधार ठरू शकेल, असे इलेट्रॉनिक्स क्लस्टर भोसरीत कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे संबंधित उद्योगांचे उत्पादन वेगात होऊन त्याचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. तसेच कररूपातून केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीतही भर पडणार आहे. या क्लस्टरच्या उभारणीसाठी सुमारे ६७ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
इलेट्रॉनिक्स क्लस्टर व्हावे, यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंड्स्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरने (एमसीसीआयए) गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारच्या इलेट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यासाठी ५० कोटी रुपये, राज्य सरकारने ६ कोटी ७० लाख रुपये आणि उर्वरित रक्कम ‘एमसीसीआयए’ने उद्योगांच्या सहकार्याने उभारली आहे. या क्लस्टरचे दोन महिन्यांपूर्वी उदघाटन झाले आहे. आता ते कार्यान्वित झाले असून येत्या काही महिन्यांत उभारणीची प्रक्रिया पूर्ण होईल. ‘एमसीसीआयए’ क्लस्टरमध्ये समन्वयाचे काम पाहणार असून जर्मन कंपनी टियूव्ही र्हाईनलॅन्ड, सायक्रोनिक्स इन्स्ट्रूमेंटस प्रायव्हेट लिमिटेड, इनट्यूपल सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ॲव्हेंच सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होणार आहेत. क्लस्टरच्या उभारणीसाठी ‘एमसीसीआयए इलेट्रॉनिक्स क्लस्टर फाऊंडेशन’ने टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनसाठी ५० कोटी रुपयांची उपकरणे येथे उपलब्ध करून दिली आहेत.
क्लस्टरमध्ये नेमके काय होणार
उद्योगांना त्यांच्या उत्पादनांचे टेस्ट, मेजरमेंट, डिझाईन, सर्टिफिकेशन आदी सेवांसाठी बंगळुरसारख्या शहरांवर किंवा काही संस्थांवर अवलंबून राहवे लागत होते. त्यासाठी खर्चही जास्त होत आणि वेळही लागत असे. त्याचा थेट फटका उद्योगांच्या उत्पादनांवर होत. टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनसाठी आता पुण्यातच क्लस्टर झाल्यामुळे त्याचा फायदा इलेट्रॉनिक्स क्षेत्रातील पुणे आणि परिसरातील सुमारे ४०० हून अधिक उद्योगांना होणार आहे. भविष्यात पुणे परिसरात उद्योगांची संख्या वाढणार आहे, हे लक्षात घेऊन या क्लस्टरची रचना करण्यात आली आहे.
क्लस्टरचा फायदा या क्षेत्रांना होणार
इलेट्रॉनिक्स बरोबरच ऑटोमोबाईल क्षेत्र, वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्या, गृहोपयोगी वस्तू तयार करणाऱ्या कंपन्या, टेलिकम्युनिकेशन आदी विविध क्षेत्रातील कंपन्या या क्लस्टरचा फायदा घेऊ शकतील. तसेच लघुउद्योग, स्टार्टअप्स यांनाही क्लस्टरमधील सुविधांचा लाभ फिफायतशीर दरात घेता येईल. भोसरीमध्ये हे क्लस्टर कार्यान्वित झाले आहे.
प्रशांत गिरबने (महासंचालक, एमसीसीआयए) - भोसरीतील इलेट्रॉनिक्स क्लस्टरमुळे पुणे आणि परिसरातील उद्योगांना त्यांच्या कंपन्यांजवळ टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे त्यांचे उत्पादन वाढू शकते आणि रोजगार निर्मितीला चालना मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.