पुणे

Pune Murder: दोन राज्यांना हादरवणारी घटना! पुण्याच्या उद्योगपतीची कर्नाटकात हत्या, पत्नीलाही केलं जखमी

सकाळ वृत्तसेवा

Pune murder: पुणे येथील प्रसिद्ध उद्योजकाचा हाणकोण येथे रविवारी खुन झाला. चार ते पाच मारेकऱ्यांनी हा खून केला. विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. ते मुळचे हाणकोणचे रहिवासी आहेत. या हल्ल्यात त्यांची पत्नी जखमी झाली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, विनायक नाईक हे स्वत: मोठे उद्योजक आहेत. त्यांचा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा व्यवसाय आहे. कारवार तालुक्यातील आपल्या मूळ गावी हाणकोण येथे सातेरी देवीच्या उत्सवा निमित्त ते गेले होते. (Businessman Vinayak Naik Murder Case)

मात्र त्यांच्या आईचे श्राद्ध असल्यामुळे ते येथेच राहिले. रविवारी सकाळी ते पुण्याकडे जाण्याचा तयारीत होते. सकाळी साडेपाचच्या दरम्यान चार ते पाच अनोळखी मारेकऱ्यांनी मोटारीतून येऊन त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पत्नीकडून प्रतिकार

या वेळी त्यांची पत्नी वृषाली विनायक नाईक यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या देखील जखमी झाल्या. घटनेची नोंद सदाशिवगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कारवारचे पोलिस अधीक्षक के. नारायण यांनी घटनास्थळी जावून हल्ला केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde: बुजवलेला खड्डा पुन्हा खोदला; पोलिसांचा मोठा फौजफाटा, अखेर अक्षय शिंदेचा दफनविधी पूर्ण

Rohit Sharma: मुंबईच्या 'लोकल'ने मला टफ केलं...; रोहितनं सांगितलं कशी झाली क्रिकेटची सुरुवात अन् का घेतली T20I निवृत्ती

MLA Nitin Deshmukh's Son : ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला; सराईत गुन्हेगारांकडून बेदम मारहाण

Akshay Shinde: जंगलात पुरा नाहीतर...; अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला तृतीयपंथीयांचा विरोध, दिला थेट इशारा

WTC 2023-25 Points Table: श्रीलंकेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडला व्हाईटवॉशचा धक्का अन् वाढलं भारत-ऑस्ट्रेलियाचं टेन्शन

SCROLL FOR NEXT