pune Fintech Meetup Sakal
पुणे

स्टार्टअपची संख्या वाढवण्यासाठी ‘पुणे फिनटेक मीटअप’ चे आयोजन

वित्तीय संस्था आणि मोठ्या फिनटेकचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील फिनटेक अर्थव्यवस्थेला चालना देत पुढील वर्षात येथील फिनटेक स्टार्टअपची संख्या २०० पर्यंत वाढवण्यासाठी ‘पुणे फिनटेक मीटअप’ चे आयोजन करण्यात आले होते. स्वतःची फिनटेक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी यात चर्चा झाली. तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी पुरविण्यावर भर देण्यात आला.

शिवाजीनगर येथील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या मुख्यालयात ‘पुणे फिनटेक मीटअप’च्या पहिल्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले. ‘पुणे फिनटेक मीटअप’ हा पुण्यातील एक समुदाय आहे. ज्यामध्ये अनेक वित्तीय सेवा संस्थांमधील व्यावसायिक, पुण्यातील मोठ्या फिनटेक, गुंतवणूकदार आणि इनक्युबेशन भागीदार यांचा समावेश आहे. पुणे फिनटेक मीटअपची संकल्पना पुणे स्थित इनक्युबेटरने मांडली आहे. फिनटेक मीटअप देशातील सर्वात मोठी फिनटेक प्रवर्तक आणि आणि टेक स्टार्टअप्ससाठी आयडियाज टू इम्पॅक्ट ठरणार आहे.

प्रारंभिक टप्प्यातील फिनटेक स्टार्टअप्ससाठी इनक्युबेशन कार्यक्रम लवकरच सुरू केला जाईल.

दी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सहकारी बँकांच्या कामकाजावर प्रकाश टाकला. सहकारी बँकिंग विभाग मजबूत करण्यासाठी फिनटेक आणि सहकारी बँका एकत्र कसे काम करू शकतात, असे ते म्हणाले. बँकांतील पदाधिकारी, फिनटेक संस्थापक आणि वित्तीय सेवा व्यावसायिक अशा १५० हून जणांचा या मीटअपमध्ये सहभाग होता. पुण्यात फिनटेक गुंतवणूक कशी वाढवली जाऊ शकते यावर काही अभ्यासपूर्ण सत्रे आणि चर्चा यात झाली.

आर्थिक सेवांबद्दल समज असलेल्या व्यवसायाची स्थापना, मनुष्यबळ आणि तांत्रिक कौशल्याच्या कमी खर्चात पुणे एक उत्तम पायाभूत सुविधा देते. पुण्यात मोठ्या बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) संस्था आणि नॅशनल इन्शुरन्स अकादमी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, आरबीआय कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंग आणि वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (व्हीएएमएनआयसीओएम) सारख्या मोठ्या प्रमाणात आर्थिक शैक्षणिक संस्था आहेत. त्याचा उपयोग फिनटेकला होर्इल.

अभिशांत पंत, संस्थापक, द फिनटेक मीटअप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT