sanjay jagtap sakal
पुणे

पुणे : पहिले सहकारी तत्त्वावरील रुग्णालय सासवड व फुरसुंगीत होणार

सासवडला आनंदी मल्टिस्पेशालिटी सहकारी हॉस्पीटलचे मुख्य प्रवर्तक म्हणून आमदार संजय जगताप यांची माहिती

- श्रीकृष्ण नेवसे

सासवड : पुणे जिल्ह्यातील पहीले सहकारी तत्तावरील रुग्णालय सासवड (ता. पुरंदर) व फुरसुंगी (ता. हवेली) येथे होणार आहे. सासवडला आज आनंदी मल्टिस्पेशालिटी को. आॅप. हाॅस्पीटलचे मुख्य प्रवर्तक म्हणून पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी आज पत्रकार परीषदेत ही घोषणा केली. त्यासाठी शासनाच्या सहकार विभागाकडे रितसर नोंदणी झाली असून काल प्रमाणपत्रही प्राप्त झाल्याचे त्यांनी नियोजित संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज स्पष्ट केले.

दिवंगत `चंदुकाका जगताप सहकार भवनात` यावेळी आमदार जगताप म्हणाले., सहकारमहर्षी कै. चंदुकाका जगताप यांनी पुरंदर तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून विविध पद्धतीने नेत्रदिपक कामगिरी केली. पुरंदर नागरी सह. पतसंस्था, श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, संत श्री. सोपानकाका सह. बँक, इंदिरा महिला सह.पतसंस्था, पुरंदर मिल्क अॅण्ड अॅग्रो. प्राॅडक्टस् लि., शितगृह (कोल्डस्टोअरेज) आदी सहकारी व विधायकतेद्वारे तालुक्यातील उद्यमशिलतेस आणि अर्थकारणास यशस्वी चालना दिली.

सर्व संस्थांना लेखा परीक्षणात `अ` दर्जा प्राप्त आहे. त्यांच्याच ध्येयधोरणांवर वाटचाल करीत.. आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात लोकोपयोगी सुविधेचा पाया रचण्यात येत आहे. प्रारंभी 500 सभासद व 23 लाख रुपयांचे भागभांडवल जमा करुन नियोजित संस्थेची नोंदणी प्रक्रीया आता पूर्ण झाली आहे. समभाग व नोंदणीशुल्क संस्था कार्यालयात भरणा करुन इच्छुकांना यापुढे सभासद होता येईल. सभासद व कुटुंबियांना रुग्णालयातून सवलतीच्या दरात व प्राधान्यक्रमाने उपचाराचे लाभ मिळतील. इतर रुग्णांनाही त्याच्या पाठोपाठ लाभ असेलच. प्रारंभिक टप्प्यात सासवड येथे 180 खाटांचे सुसज्ज रुग्णालय आणि फुरसुंगी येथे 350 खाटांचे अत्याधुनिक उपचार सुविधासंपन्न रुग्णालय विकसीत होईल. त्याबरोबरच या रुग्णालयांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय आणि परिचर्या, अौषध निर्माता,, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, दंतचिकीत्सा आदी अभ्यासक्रम सुरु होतील. भविष्यात पुणे जिल्हा आणि अन्यत्रही ही रुग्णालय शृंखला विकसीत करण्याचा मनोदय आ. जगताप यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी पत्रकार परीषदेस ग्रामीण स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनीताई संजय जगताप, उपक्रमाचे सहप्रवर्तक दिपक मा. जगताप, संचालक डॉ. प्रविण जगताप, डॉ. अजित साबळे, डॉ. सुमित काकडे, डॉ. रविंद्र कुंभार, डॉ. संदीप होले, डॉ. सचिन निरगुडे, डॉ. विनायक खाडे, डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, डॉ. सुनिल बांदल, डॉ. वृषाली मासाळ, डॉ. आरती निगडे, योगिता झांबरे, अनिल उरवणे, गुलाबराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कोकरे, आभार शहाजी गरुड यांनी मानले.

कोरोना काळाने सूचविले व रुग्णालयाची संकल्पना पुढे आली : आमदार जगताप

आमदार संजय जगताप यांनी सांगितले की., निरोगी आरोग्य प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी विभीन्न उपचार पद्धती विकसीत झाल्या आहेत. तथापी बदलती गतीमान जीवनशैली, पराकोटीची स्पर्धा, तणावपूर्ण मनस्थिती, विपरीत आहार - विहार, व्यसनाधिनता यातून मानवी जीवनातील व्याधींनीही गंभीर स्वरुप धारण केले आहे. रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, नैराश्य यासारख्या समस्या व त्यातून उद्भवणाऱया ह्दयविकार, मुत्रपिंड विकार, मेंदुविकार असे प्राणघातक आजार आता मनुष्यमात्रावर व साथीच्या स्वरुपातही आक्रमण करीत आहेत. इतकेच नव्हे तर मागील 20 महिने कोरोना महामारीच्या काळात अत्याधुनिक व विपुल सुविधांअभावी अगतिकता अनुभवावी लागली आहे. या काळात आपल्या ग्रामीण स्वयंसेवी संस्थामार्फत खळद व उरुळी देवाची येथे एकुण 300 खाटांचे अलगीकरण कक्ष व प्राणवायु सुविधेसह 150 खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तथापि सर्वसामान्य जनेतेस स्थायी स्वरुपात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा माफक दरात उपलब्ध होणे., ही काळाची गरज असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले. त्यातूनच हे सासवड आणि फुरसुंगीचे रुग्णालय आकाराला येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT