Pune Flood: sakal
पुणे

Pune Flood: पूर ओसरला, मदत सरसावली, लोक सावरले !

Pune Flood: नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध केले गेले, महापालिकेच्या वतीने निंबज नगर परिसरात दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

जागृती कुलकर्णी

Sihagad Road: चोवीस तासात दोनदा आलेले पाणी आणि ओसरलेला पूर यानंतर प्रशासन लोकप्रतिनिधी विविध संघटना यांच्या माध्यमातून सरसवलेली मदत लोकांना सावरण्यासाठी सहकार्य करत आहेत दिनांक 25 जुलै रोजी पहाटे चार वाजता एकता नगरी परिसरात पाणी येण्यास सुरुवात झाली हे पाणी हळूहळू वाढत गेले यामध्ये अनेक सोसायट्यात पाणी शिरले.   

पण पावसाचा जोर कमी झाला धरणात येणारे पाणी त्यानंतर आजूबाजूंनी येणारे पाणी कमी व्हायला लागले आणि पूर ओसरायला लागला. परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. महापालिकेच्या वतीने आरोग्याची संपूर्ण टीम स्वच्छतेसाठी आणि फवारणीसाठी सज्ज झाली होती. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध केले गेले. 

एकता नगरीतील सगळ्या सोसायटी, त्यासोबतच त्याच परिसरातील संगम, शिवाली, साईप्रसाद, शांताई, सिताली, शरयू, कुंज, राधा कृष्ण नगरी या भागात देखील पुराचे पाणी आल्याने नागरिकांचे हाल झाले होते. 

काका चव्हाण यांच्या वतीने ८० हून अधिक स्वच्छता कर्मचारी, बारा टीम पाण्याच्या टाक्या साफ करण्यासाठी कामाला लागले होते. माजी नगरसेविका ज्योती गोसावी यांच्या वतीने जेवणाचे किट पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून देण्यात आली. माजी नगरसेवक श्रीकांत जगताप, श्रावणी जगताप,  यांच्या वतीने देखील जेवण आणि पाणी बाटल्याचे किट देण्यात आले. महापालिकेच्या वतीने निंबज नगर परिसरात दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

या अंतर्गत नागरिकांना औषधोपचार तसेच आरोग्य तपासणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पंचनामे करण्यासाठी उपविभागीय अधिकारी संजय असोलेकर, तहसिलदार किरण सुरवसे  यांच्या नेतृत्वात नायब तहसिलदार, तलाठी यांच्यासह १०० जणाची टीम   संपूर्ण टीम पंचनामे करत आहे. हिंगणे परिसरातील साईनगर खोराड वस्ती भागात देखील महापालिकेच्या वतीने आरोग्याचे कर्मचारी स्वच्छतेचे काम करत आहे तसेच या भागात देखील पंचनामांचे काम करण्यात येणार आहे.

 सिंहगड रस्ता परिसरात ज्या ज्या भागात पाणी आले त्या सर्व भागात महापालिका लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था यांच्या वतीने मदत कार्य सुरू आहे. लोकप्रतिनिधींमध्ये प्रसन्न जगताप, सचिन मोरे, हरिदास चरवड यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी स्वयंसेवी संस्था मदतीसाठी सरसावले आहेत. या सगळ्यातून नागरिक देखील सावरण्याचा प्रयत्न सुरू करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT