pune market esakal
पुणे

Pune Market News : लसूण, गवार, टोमॅटोच्या भावांत वीस टक्क्यांनी वाढ

मार्केट यार्ड : बाजारात पालेभाज्या, फळांसह फुलांचे भाव कमी

सकाळ डिजिटल टीम

मार्केटयार्ड : भाजीपाला बाजारात गेल्या आठवड्याइतकीच रविवारी (ता. २३) फळभाज्यांची आवक झाली. आवक कमी असली तरी मागणी चांगली आहे. लसूण, गवार, भेंडी, टोमॅटो, दोडका, फ्लॉवर, कोबी, वांगी, भुईमूग शेंगांच्या भावांत गेल्या आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी वाढ दिसून आली. इतर बहुतांश भाजीपाल्याचे भाव कायम होते.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्याच्या आवकेत कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे ८ ते १० टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी २ ते ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, इंदूर येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, कर्नाटक येथून मटार २ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग १ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे ७ टेम्पो आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेत सातारी आले सुमारे ६०० ते ७०० गोणी, गवार, भेंडी प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो सुमारे साडेपाच ते सहा हजार क्रेट, हिरवी मिरची २ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे ७० ते ८० गोणी, मटार २ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा सुमारे ३५ ते ४० ट्रक, इंदूर, आग्रा भागातून बटाटा ५० ट्रक आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव

कांदा : १००-१५०, बटाटा : १३०-२१०, लसूण : ७५०-१५००, आले : १०००-१४००, भेंडी : २५०- ३५०, गवार : गावरान व सुरती ३००-६००, टोमॅटो : ६००-१०००, दोडका : ३५०-४५०, हिरवी मिरची : ५००-६००, दुधीभोपळा : १५०-२५०, चवळी : २००-३००, काकडी : १००-१६०, कारली : हिरवी २८०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : ५००-६००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १००-१५०, वांगी :

३००-४००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ६००-६५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : ३००, गाजर : २००-२५०, वालवर : ५००-६००, बीट : १४०-१५०, घेवडा : ६००-७००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २५०- ३००, ढेमसे : ३००-३५०, भुईमुग शेंग : ६००-७०००, मटार : परराज्य: १६००, पावटा : ३००- ४००, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१०००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

पालेभाज्यांचे भाव घटले

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. परिणामी मेथी, कोथिंबीरसह इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली होती. कोथिंबिरीची तब्बल १ लाख ७५ हजार, तर मेथीची ८० हजार जुडी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली

ओल्या फुलांची आवक जेमतेम

बाजारात फुलांची आवक साधारण झाली आहे; मात्र एकूण आवकेत तब्बल ५० टक्के ओल्या फुलांचे प्रमाण आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसामुळे मागणी कमी असल्याने भावात घसरण झाली आहे.

फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-६०, गुलछडी : ५०-६०, अष्टर : जुडी २०-३०, सुट्टा १००-१२०, कापरी : २०-४०, शेवंती : ५०-७०,

(गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ५-१५, डच गुलाब (२० नग) : ४०-६०, जर्बेरा : ३०-४०, कार्नेशियन : ४०-६०, शेवंती काडी १००-१२०, लिलियम (१० काड्या) ६००-८००, आॅर्चिड ५००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१२०, जिप्सोफिला : ४०-८०, मोगरा : २००-३००.

डाळिंब, कलिंगड आणि खरबुजाचे भाव कमी

मार्केट यार्डात डाळिंब, कलिंगड आणि खरबुजाच्या भावात घट झाली असून, लिंबू, अननस, संत्रा, मोसंबी, पपई, चिकू आणि सीताफळाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़.

रविवारी फळबाजारात केरळ येथून अननस ५ ट्रक, मोसंबी ३० ते ४० टन, डाळिंब ६० ते ७५ टन, पपई १८ ते २० टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड ६ ते ७ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, पेरू २०० क्रेट, सीताफळ ७ ते ८ टन, चिकू १०० गोणी इतकी आवक झाली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव

कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : ४००-१०००, शेपू : ४००-७००, कांदापात : ६००-१२००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००- ६००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ४००-१२००, राजगिरा : ४००-६००, चुका : ४००-७००, चवळई : ३००-६००, पालक : ६००-१५००.

असे आहेत फळांचे भाव

लिंबे (प्रतिगोणी) : ७०-२५०, मोसंबी : (३ डझन) : १००-२६०, (४ डझन) : ४०-१००, संत्रा : (१० किलो) : २००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१५०, गणेश : ५-२५, आरक्ता १५-८०, कलिंगड : १२-२०, खरबूज : १५-३०, पपई : १५-२५, अननस (एक डझन) : १००-५००, पेरू (वीस किलो) : ३००-५००, चिकू (दहा किलो) : १००-५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT