जलतरण तलाव  sakal
पुणे

Pune : गोंधळेनगरचा जलतरण तलाव अद्यापही नादुरुस्तच

जलतरण शौकींनांकडून सात वर्षांपासून प्रतिक्षा

कृष्णकांत कोबल

हडपसर : सात वर्षात दोन वेळा उद्घाटन होऊनही नादुरुस्त असलेला गोंधळेनगर येथील स्व. आर. आर. पाटील जलतरण तलाव अद्यापही जलतरणासाठी प्रतिक्षेतच आहे. परिसरातील जलतरण शौकींनांमध्ये त्यामुळे नाराजी पसरली असून त्यांच्याकडून पालिकेच्या उदासिनतेबाबत संताप व्यक्त होत आहे.

पालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने गोंधळेनगर येथील स्वर्गीय रामचंद्र बनकर क्रीडा व शैक्षणिक संकुलात सात वर्षांपूर्वी स्वर्गीय आर. आर. पाटील जलतरण तलाव उभारण्यात आला आहे. डिसेंबर २०१६ मध्ये खासदार शरद पवार यांच्या हस्ते या तलावाचे उद्घाटन झाले आहे. मात्र, त्यानंतर तो नागरिकांसाठी खुले होणे अपेक्षित असतानाही ठेकेदारीच्या वादात तसेच तलावाची उंची जास्त असल्याचे कारण देत पाच वर्ष तो सुरूच झाला नाही.

त्यानंतर २०२१ मध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे यांनी हा तलाव सुरू व्हावा, यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यांनी तो दुरुस्तीचा आदेश दिला. त्यानंतर त्याची दुरुस्तीही करण्यात आली. मात्र, त्या दुरुस्तीनंतरही हा जलतरण तलाव लिकेज असल्याचे सांगत तो सध्याही दुरूस्तीसाठी बंद ठेवला जात असल्याचे सांगितले जात आहे.

"या तलावामुळे परिसरातील मुलांना व जलतरणपटूंना चांगली सुविधा निर्माण झाल्याचा आनंद झाला होता. प्रत्येक सुट्टीमध्ये मुले आशेने तलावाकडे जाऊन येत आहेत. मात्र, प्रत्येकवेळी त्यांची निराशाच होत आहे. या उन्हाळी सुट्टीततरी या तलावाचा आनंद घेता येईल, अशी आशा होती. मात्र, तलावाची दुरूस्ती सुरू असल्याचेच सांगितले जात आहे. मुलांना व हौशी जलतरणपटूंना दूर खासगी तलावाकडे जावे लागत आहे. पालिका प्रशासन ही सुविधा देण्यात

उदासीनता दाखवत आहे. त्याबाबत गांभीर्याने घेऊन हा जलतरण तलाव लवकर सुरू करावा अन्यथा नागरिकांना आंदोलन करावे लागेल,' असा इशारा आम आदमी पार्टीचे दिलीप गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते शशिभूषण घोलप यांनी दिला आहे.

"कोट्यवधी रूपये खर्च करूनही गेली सात वर्षापासून स्व. आर.आर. पाटील जलतरण तलाव बंद आहे. त्यामुळे स्थानिक जलतरणपटूंना त्याचा लाभ घेता आलेला नाही. नवीन जलतरणपटू घडू शकले नाहीत. जलतरण शौकींनांसाठी तलावाचा वापर झालेला नसतानाही दोन दोन वेळा केवळ दुरूस्ती करावी लागत असेल तर त्याचा अभियंता, बांधकाम ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरून तलावाच्या उभारणीसाठी खर्च झालेली रक्कम वसूल करावी. पालिकेच्या अशा कारभारामुळे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होऊन नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहवे लागत आहे.'

प्रशांत सुरसे, सामाजिक कार्यकर्ते

"या तलावाची उंची जास्त झाली होती ती नियमानुसार करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तलावाची उंची कमी करण्यात आली होती. दुरूस्तीचे काम झाल्यावर तपासणीत हा तलाव लिकेज असल्याचे समजले. पुन्हा तो दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे. येत्या पंधरा दिवसात तो जलतरणासाठी सुरू करण्यात येईल.'

मिनाक्षी ठाकूर, सहाय्यक क्रीडा अधिकारी, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT