Pune Ganapati: पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं वेळेमध्ये विसर्जन झालं. शहरामध्ये मंगळवारी सकाळीपासूनच उत्साह दिसून येत होता. पुणेकरांनी जड अंतःकरणाने गणरायाला निरोप दिला.
पुण्यातला मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं विसर्जन मंगळवारी ४ वाजून ३५ मिनिटांनी झालं. दुसरा मानाचा गणपती तांबडे जोगेश्वरीचं विसर्जन ५ वाजून १० मिनिटांनी झालं. तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम या बाप्पाचं ५ वाजून ४४ मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन ७ वाजून १५ मिनिटांनी झालं असून मानाच्या पाचव्या गणपतीचं विसर्जन (केसरीवाडा) ७ वाजून ३७ मिनिटांनी झालं. पुणेकरांनी मोठ्या जल्लोषात मानाच्या गणपतींना निरोप दिला.
पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल, ताशा, परंपारिक वाद्य, पारंपारिक कलाप्रकाराने मिरवणुका निघाल्या. रात्री डीजेचा दणदणतादेखील ऐकायला मिळाला. बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि त्याचं विलोभनीय रुप बघण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.