Pune Ganesh Festival  sakal
पुणे

Pune Ganesh Festival : गणेशोत्सवाच्या बैठकीत साऊंडच्या भिंतीविरोधात ‘आवाज’ ; महापालिका धोरण तयार करणार ,आयुक्तांची माहिती

गणेशोत्सवात प्रचंड आवाजात वाजवल्या जाणाऱ्या साऊंडच्या भिंती, लेजर लाईटवर वर बंदी घाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवात प्रचंड आवाजात वाजवल्या जाणाऱ्या साऊंडच्या भिंती, लेजर लाईटवर वर बंदी घाला. त्यामुळे कानाचे, हृदयाचे, डोळ्याचे आजार होत आहेत असे पुणे महापालिकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत डॉक्टर, सामाजिक संस्था, संघटनेच्या प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. त्यास गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. पण विनाकारण गणेश मंडळ कार्यकर्त्यांची बदनामी करू नका. कोरोनासह अडीअडचणीच्या काळात तोच समाजाच्या मदतीला धावून जातो असे सांगितले. दरम्यान, या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पोलिसांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. मंडळांच्या जाहिरात कमानींसाठी धोरण तयार केले जाईल, असे आश्‍वासन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात पुणे महापालिकेत आज गणेश मंडळांचे कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, विशेष शाखेचे उपायुक्त संदीपसिंह गिल, महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप, महेश पाटील, आशा राऊत, चेतना केरूरे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

साऊंडच्या भिंती, लेजर लाईटवर बंदी घाला, ढोल ताशाचा आवाज कमी करा. यामुळे शांतता क्षेत्रातील नागरिक, रुग्णालयातील रुग्णांना त्रास होत आहे. गणपतीमध्ये अश्लील गाण्यावरील होणारे नाच बंद करा. साऊंडच्या भिंतीमुळे उच्च रक्तदाब, ह्दयरोगाचा त्रास होतो. हा त्रास वाढून रुग्णांचा मृत्यू देखील होतो. दुसरीकडे कार्यकर्त्यांचा धांगडधिंगा सुरू असतो. समाजाच्या विचार करून हे प्रकार थांबवा, जाहिरात कमानींमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. रुग्णवाहिकांना जाण्यासाठी जागा शिल्लक नसते. सर्वांचा विचार करून चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला जावा, अशी मागणी सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, डॉक्टरांनी बैठकीत केली.

आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांनी, इतर नागरिकांनी जे मुद्दे मांडले आहेत, ते सर्व लिहून घेतले आहेत. गणेशोत्सवापूर्वी पोलिस, महावितरण यांच्यासह अन्य विभागांची बैठक घेतली जाणार आहे. त्यात यावर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. ध्वनीप्रदुषणाच्या बाबतीत गणेश मंडळांनी नियम पाळावेत. ध्वनी प्रदूषणाची तक्रार करण्यासाठी परिमंडळनिहाय नंबर जाहीर केला जाईल. मंडळाच्या उत्पन्नासाठी जाहिरातीसाठी धोरण तयार केले जाईल. पूर्वीचे सर्व निर्णय कायम राहतील. कमानीमुळे रस्त्याची रुंदी‌ कमी होणार नाही. फिरत्या स्वच्छतागृहांची दर तासाला स्वच्छता केली जाईल.

गणेश मंडळ कार्यकर्त्यांची भूमिका

  • - गणेशोत्सव बघण्यासाठी नागरिक येतात, कोणत्या भागात कोणते मंडळ आहे याची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावावेत

  • - मंडळांचा खर्च वाढत असल्याने महापालिकेने आर्थिक सहकार्य करावे

  • - महावितरणकडून महाग वीज दिली जात आहे, गेल्यावर्षीचे डिपॉजिटची रक्कमही परत केली नाही. वीज दर कमी करावा

  • - संभाजी उद्यानासमोर मेट्रोच्या पादचारी पुलाची उंची केवळ १७ फुटाची आहे.मिरवणुकीचे रथ नेण्यास अडथळा निर्माण झाला.

  • - कार्यकर्ते काही तरी चांगले करतात म्हणूनच लाखो लोक गणेशोत्सव सहभागी होतात. त्यांना विनाकारण गुंड, रिकामटेकडा, मवाली समजू नये

  • - ध्वनी प्रदूषण, लेजर लाईटला ८५ टक्के कार्यकर्त्यांचा विरोध आहेच, पण वर्षभर साऊंडच्या भिंती लावल्या जातात, त्यावर कोणीच आक्षेप घेत नाहीत.

  • - स्पीकरचा आवाजच ७५ डेसीबलच्या आत असावा अशी त्यांची निर्मिती करा

  • - पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, चौकीत नेऊन बसविले जाते.

  • - गणेश मूर्ती विक्रेत्यांना ३१ ऑगस्टपर्यंत परवानग्या द्याव्यात.

  • आयुक्त म्हणाले मी मंडळाचा कार्यकर्ता

अनेक कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना चुकीची वागणूक दिली जाते. त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलले जाते यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर आयुक्त म्हणाले, ‘‘मी सुद्धा कामा मंडळाचा कार्यकर्ता होतो, त्यामुळे आपण आपले काम करत राहायचे. कोण काय बोलत आहे त्याकडे लक्ष देऊ नका.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT