Representative Image Pune Ganesh Visarjan Dhol Pathak Sakai Digital
पुणे

पुणे : ढोलपथकांनो, यंदा अनर्थ टळला; पण पुढल्या वर्षी हे लक्षात ठेवाच!

उमेश शेळेके

Pune Ganesh Visarjan 2022 Dhol Pathak

पुणे : यंदाच्या विसर्जन मिरवणूकीत ढोलताशा पथकांनी स्वयंशिस्त आणि संकेत तुडविण्याचा कळस गाठला. त्यांच्या या मनमानी कारभारामुळे वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागण्यासारखी परिस्थिती शनिवारी रात्री अनेक ठिकाणी निर्माण झाली. किरकोळ वगळता सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. वादकांच्या संख्येवर नसलेले नियंत्रण, मनमानी करीत रस्ताबंद करणे , प्रत्येक ठिकाणी स्थिर वादनाचा आग्रह आणि मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांवर दादागिरी करण्याचे प्रकार पाहावयास मिळाले. मिरवणुकीस विलंब होण्यामागे हे देखील एक कारण ठरले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी यंदा विसर्जन मिरवणूक होत असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राज्य सरकारने देखील निर्बंध मुक्त उत्सवाची घोषणा केली होती. त्याचा फायदा घेत ढोलपथकांनी निरंकुश पद्धतीने विसर्जन मिरवणूक आपले दर्शन पुणेकरांना घडविले. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यासह सर्वच मार्गावर पथकांकडून अडवणुकीचे प्रकार घडले. त्यातून अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. रात्री नऊच्या सुमारास टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदीराच्या पुढे ढोलपथकाने रस्ताच बंद करून टाकला. परिणामी स्वारगेटकडून टिळक चौकाकडे जाणाऱ्या भाविकांची तेथे कोंडी झाली. मागून गर्दीचा रेटा वाढल्याने महिला, लहान मुले अशरश: गुदमरली. काही महिला जखमीही झाल्या. अखेर भडकलेल्या नागरिकांनी वादकांवर धावून जात शिवीगाळ केली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हीच परिस्थीती लक्ष्मी रस्त्यावर निार्मण झाली होती. रात्री बाराच्या सुमारास श्रींमंत दगडूशेठ मंडळाच्या मागील बाजूस ढोलपथकाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता बंद करून टाकला. त्यामुळे टिळक चौकाकडून बेलबाग चौकाकडे येणारे, शिवाजी रस्त्याकडे जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली. तर बेलबाग चौकातून मंडईकडे जाणारे नागरिकही या गर्दी अडकून पडल्याने दोन महिलांचे जीव गुदमरला. ढकलाढकली झाल्याने अनेक जण किरकोळ जखमी झाले. कुठेकर रस्त्यावर महाराष्ट्र बँकेसमोर अशा प्रकारे पथकांनी दादागिरी करीत रस्ता व्यापल्याने चेंगराचेंगरी झाली.

पथकांतील वादकांच्या संख्येवर नियंत्रण नाही

निर्बंधमुक्तमुळे पथकातील वादकांच्या संख्येवर यंदा नियंत्रण नसल्याचे पाहवायास मिळाले. वादक आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी कार्यकर्ते असे प्रत्येक पथकामध्ये किमान ऐंशी जण होते. याशिवाय ध्वजपथकाची संख्या वेगळीच. एकाच पथकाचे दोन पथके यामुळे एक किलोमीटरपर्यंतचा रस्ता पथकांनीच व्यापले होते. जागोजागी रस्ता अडविण्याच्या प्रकारामुळे येणाऱ्या भाविकांना पारंपारिक खेळ बघण्याऐवजी मनस्तापच सहन करावा लागत होता.

मिरवणुकीला पथकांमुळेही विलंब

पथकांची संख्या आणि त्यातील वादकांची संख्या यावर पोलीसांचे कोणतीही नियंत्रण नसल्याने त्याचा फटका विसर्जन मिरवणुकालाही बसला. स्थिर वादनामुळे एका पथक किमान वीस ते तीस मिनिटे थांबत होते. एका पथकाचे वादन झाले कि दुसऱ्या पथकाचे वादन. प्रत्येक मंडळापुढे किमान तीन पथक, परिणामी प्रत्येक चौकात किमान एक तासाहून अधिक काळ या पथकांना पुढे सरकण्यास वेळ लागत होता. चौक सोडूनही ही पथके मध्येच थांबून रस्त्यावर वाद करीत होती. याशिवाय पथकाच्या पुढे ध्वजपथक. काही मंडळापुढे चार ते पाच पथके सहभागी झाल्याने या सर्वांचा परिणाम मिरवणूकीवर झाला.

ढोलताथा पथकांना पोलीसांचे अभय

मानाच्या गणपतींमुळे विलंब झाल्याने पोलीसांनी शनिवारी सकाळी "डिजे"वाल्या मंडळांना जबरदस्तीने पुढे ढकलत वेळेवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे ढोल ताशा पथकांवर मेहेरबानी दाखवित त्यांना मुक्तहस्त वादन करण्यास मोकळीक दिली. डिजे लावणाऱ्या मंडळांना जबरदस्तीने पुढे ढकलण्यास सुरुवात केली. काही मंडळाच्या ट्रॅक्टरच्या डेकवर नृत्य करणाऱ्या तरुणांना काठीचा प्रसाद देत ट्रॅक्टर पुढे घेण्यास सुरुवात केली. परंतु ढोल ताशा पथकांना वादन करण्यास पोलीसांकहून रस्ता मोकळा करून दिला जात होता.

ढोलताथा पथकांकडून काय अपेक्षा

-पथकातील वादकांची संख्या निश्‍चित असावी

-पथकाने स्वयंशिस्त पाळावी

- भाविकांना येण्या-जाण्यासाठी दोन्ही बाजूने रस्ता सोडावा

-सहायकांनी पथकाबरोबराच बाजूची गर्दी नियंत्रित करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT