Chadrakant Patil News : दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर राज्यसह पुण्यात गणपती विसर्जनाला उत्साहात सुरूवात झाली आहे. पुण्यातील मंडई परिसरात असलेल्या टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला पालकमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून विसर्जनला सुरूवात होण्याची परंपरा आहे. त्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आल्याने पालकमंत्रीपदाची माळ चंद्रकांत पाटलांच्याच गळ्यात पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी चंद्रकांत पाटलांना पुण्याला पालक मंत्री कधी मिळणार असं विचारले असता, "हा मान पालकमंत्र्यांचा आहे. काही दिवसातच लवकर पालकमंत्र्यांची घोषणा होईल असे सूचक विधान केले आहे. त्यात टिळक पुतळ्याला चंद्रकांत पाटील यांच्या हस्तेच पुष्पहार अर्पण केल्यामुळे आणि हा मान पालमंत्र्यांचा असतो असे सूचक विधान केल्यामुळे आगामी काळात पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटलांकडेच येणार का? या चर्चांना उधाण आले असून, आता ही माळ खरंच कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आदित्य ठाकरेंना पाहताचा तरुणींचा जल्लोष
दुसरीकडे माजी पर्यटन मंत्री आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यावेळी तरुणींचा गराडा त्यांच्याभोवती पडला आहे. अनेकजण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जमलेल्या तरुणी 'आदित्य आदित्य' म्हणत जल्लोष करत आहेत.
दरम्यान, आज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आहे. मी आज राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी, विकासासाठी नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे वाईट राजकारण होत आहे. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नीलम ताई, चंद्रकांत दादा, दादा भेटले, राजकारणा विषयी काही चर्चा झाली नाही. उत्सवी वातावरण आहे. त्यामुळे राजकीय विषय नको, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.