Hindu-Janjagruti-Samiti sakal
पुणे

Pune : भगवान श्रीराम यांचा अवमान करणाऱ्यांना तत्काळ अटक करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

कर्नाटकातील वादग्रस्त प्राध्यापक के. एस. भगवान यांनी भगवान श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कर्नाटकातील वादग्रस्त प्राध्यापक के. एस. भगवान यांनी भगवान श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असून, त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू संघटनांनी केली आहे.

हिंदूंच्या श्रध्दास्थानांवर आक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात मंगळवारी (ता. २४) दशभुजा गणपतीसमोर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. भगवान श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे यापूर्वी प्राध्यापक के. एस. भगवान यांना अटक केली होती.

पुन्हा अशी आक्षेपार्ह विधान करणार नाही, या अटीवर त्यांना जामीन मिळाला होता. परंतु या अटीचा भंग केल्यामुळे त्यांना अटक करावी, अशी मागणी सरकारकडे करीत आहोत. हिंदूंच्या श्रध्दास्थानांवरील आक्रमणे सहन केली जाणार नाहीत, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी दिला. या आंदोलनास प्रा. विठ्ठल जाधव, डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराचे श्याम देशपांडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT