Pune Police 
पुणे

Pune Goons Parade: पुणे पोलिसांचा गुन्हेगारांविरोधात विशेष अजेंडा! व्हिडिओ, रील बनवल्यास थेट...

गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ, बंडू आंदेकर या कुख्यात गुडांसह त्यांच्या साथिदारांची पुणे पोलीस आयुक्तालयात आज ओळख परेड करण्यात आली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे शहरातील कुख्यात गुडांसह त्यांच्या साथिदारांची पुणे पोलीस आयुक्तालयात आज ओळख परेड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्यांना स्पष्ट निर्देश दिले. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओ, रील्स बनवल्यास काय कारवाई केली जाईल याबाबतचा पोलिसांचा अजेंडाच यावेळी सांगण्यात आला. (pune goons parade police prepares special agenda for criminals including video reel of ennoblement of crime)

कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले अशा प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील सुमारे अडीचशेहून अधिक सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले होतं. पोलिसांनी पुण्यातील सर्वच कुख्यात टोळ्या आणि त्यांच्या टोळी प्रमुखांना एकाच वेळी एकमेकांसमोर आणलं होतं. (Marathi Tajya Batmya)

यावेळी त्यांच्याकडून डोझिअर अर्थात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या नियमावलीची माहिती देणारा फॉर्म त्यांच्याकडून भरुन घेण्यात आला. यामध्ये पुणे पोलिसांचा गुन्हेगारांबाबत आणि गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्याबाबत काय अजेंडा आहे, हे स्पष्ट केलं आहे. याची माहिती मीडियासमोर जाहीररित्या त्यांना वाचून दाखवण्यात आली तसेच त्यावर सह्या देखील घेण्यात आल्या. (Marathi Tajya Batmya)

पुणे पोलिसांनी सांगितलं की, "आम्ही आधापासूनच प्रतिबंधात्मक कारवायांविरोधात विविध पावलं उचलतं असतो. त्याच्या प्लॅनिंगनुसार रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार किंवा आरोपी आहेत त्यांना कॉल करुन त्यांच्याकडून डोझिअरचा फॉर्म भरुन घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्हेगारीचं उद्दात्तीकरणं करु नये, म्हणून त्यांना प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून किंवा कायदेशीर सूचना देण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

आज २६७ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाया केल्या होत्या. ही आमचा नेहमीचीच पद्धत आहे त्याचाच हा भाग आहे. तसेच गेल्यावर्षी गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रील बनवणाऱ्यांविरोधात २४ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांचे जे फॉलोवर्स आहेत त्यांचाच गुन्हेगारीत सहभाग आढळला आहे. त्यामुळं त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवायांबाबत पावलं उचलली आहेत," असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पोलिसांचा अजेंडा काय?

1) कुठलाही गुन्हा इथून पुढं करायचा नाही, हा नव्या आयुक्तांचा गुन्हेगारांना थेट संदेश आहे.

२) कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा आणि सहभागी व्हायचं नाही.

३) गन्हेगारांचे उदात्तीकण करणारे व्हिडिओ, रील्स करायचे नाहीत. तसेच व्हॉट्सअप स्टेटसला ते ठेवायचे नाहीत. जर असे व्हिडिओ शेअर झाले तर कलम १०७ सीआरपीसी ११० अंतर्गत गुन्हा दाखल होईल. तसेच तडीपारी एलपीडी कारवाई करण्यात येणार आहे.

४) याबाबतच्या सूचना परत दिल्या जाणार नाहीत. गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारा व्हिडिओ पुन्हा दिसल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : नागपूरमध्ये शहा, खर्गे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

SCROLL FOR NEXT