Pune Goons Esakal
पुणे

Pune Goons: पोलिस आयुक्तांच्या आदेशाला गुंडांनी दाखवली केराची टोपली? सोशल मीडियावर दहशत पसरवणारे रिल्स टाकणं सुरूच

Criminal Spreading Terror In Pune: पुणे पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार अमितेश कुमार यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार अमितेश कुमार यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे. अमितेश कुमार यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात शहरातील सराईत गुन्हेगारांची परेड घेतली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून त्यांना तंबी देण्यात आली होती.

परंतु, पुणे पोलिसांच्या आदेशाला या सराईत गुन्हेगारांनी डावलल्याचं दिसत आहे. गुन्हेगारांच्या परेड नंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच आहे. पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांनी केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स टाकणे अद्यापही सुरू आहे.

पुणे पोलिसांनी निर्देश दिल्यानंतर काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचं समोर आलं आहे.

परेड काढली त्यावेळी पोलिसांनी गुंडांना स्पष्ट निर्देश दिले होते. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारे व्हिडिओ, रील्स बनवल्यास काय कारवाई केली जाईल याबाबतचा पोलिसांचा अजेंडाच यावेळी सांगण्यात आला. यावेळी पोलिसांनी कुठलाही गुन्हा इथून पुढं करायचा नाही, हा नव्या आयुक्तांचा गुन्हेगारांना थेट संदेश आहे. कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा आणि सहभागी व्हायचं नाही. गन्हेगारांचे उदात्तीकण करणारे व्हिडिओ, रील्स करायचे नाहीत. तसेच व्हॉट्सअप स्टेटसला ते ठेवायचे नाहीत. जर असे व्हिडिओ शेअर झाले तर कलम १०७ सीआरपीसी ११० अंतर्गत गुन्हा दाखल होईल. तसेच तडीपारी एलपीडी कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना परत दिल्या जाणार नाहीत. गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारा व्हिडिओ पुन्हा दिसल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार, असं पोलिसांनी म्हटलं होतं.

नीलेश घायवळ कोण आहे?

नीलेश घायवळ हा पुण्यातील गँगस्टर म्हणून ओळखला जातो. त्याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत होती. घायवळविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, मारामारी, दुखापत करणं, बेकायदा शस्त्र बाळगणं, खंडणीसाठी अपहरण असे एकूण १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे पोलिसांच्या आदेशाला या सराईत गुन्हेगारांनी काही तासांच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांत खळबळ उडाली आहे.

नीलेश घायवळ हा पुण्यातील गँगस्टर म्हणून ओळखला जातो. त्याच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत होती. घायवळविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, मारामारी, दुखापत करणं, बेकायदा शस्त्र बाळगणं, खंडणीसाठी अपहरण असे एकूण १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे पोलिसांच्या आदेशाला या सराईत गुन्हेगारांनी काही तासांच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांत खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT