girl crime 
पुणे

Pune Crime: दोघांनी अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये नेलं; एकाने लैंगिक अत्याचार केला तर दुसऱ्याने वहिनी म्हणून विनयभंग

कार्तिक पुजारी

Pune Crime: पुण्यातील हडपसर परिसरामध्ये दोन अल्पवयीन मुलीवर दोन वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत 42 वर्षीय आरोपीने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत मारहाण केली आहे. दुसऱ्या घटनेमध्ये एका 31 वर्षीय व्यक्तीने 16 वर्षीय मुलीवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला आहे. सदर घटनांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेमध्ये, 14 वर्षे मुलगी आपल्या आई-वडिलांसह हडपसर परिसरातील एका पुनर्वसन केलेल्या शासकीय वसाहतीमध्ये राहायला आहे. 42 वर्षीय आरोपीने मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरामध्ये प्रवेश करून मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपूर्वी सुद्धा लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेतून पीडिता सावरत नाही पुन्हा तिच्यावर 42 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे.

दुसऱ्या घटनेत, अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलंय. आरोपीने धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी 31 वर्षीय आरोपी आणि त्याचा दुसरा नातेवाईक या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर येथील एका हॉटेल मध्ये नेले.

31 वर्ष आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला तर त्याचा दुसरा नातेवाईक याने अल्पवयीन तरुणीला आरोपी सोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच, वहिनी म्हणून तिचा विनयभंग केला. या दोन्ही घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडल्या असून या दोन्ही आरोपी विरोधात हडपसर पोलीस स्थानकात ॲट्रॉसिटी सह लैंगिक अत्याचार आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ ते राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती; मंत्रमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

Gold Rate: सोने वर्षाच्या अखेरीस 1,00,000 रुपयांच्यावर जाणार; ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वर्तवला अंदाज

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीवर गन पॉईंटवर बलात्कार, आरोपींचा जामीन रद्द! कोर्टाने पोलिसांना फटकारले

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी कधी सुरू होणार भूसंपादन? उद्योगमंत्र्यांनी नेमकं काय सांगितले?

Latest Maharashtra News Updates : भारतीय पोलीस सेवा ७६ RR च्या प्रोबेशनर्सनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेतली भेट

SCROLL FOR NEXT