Pune Corpration sakal
पुणे

Pune Corpration : व्यावसायिकांना न्यायालयाचा दणका ; बेकायदा बांधकाम पाडल्याप्रकरणी पालिकेच्या बाजूने निकाल

पुणे-मुंबई महामार्गावर पाषाण येथे ‘हाय एनर्जी मेटेरिएल्स रिसर्च लॅबोरेटरी’ (एचईएमआरएल) या संस्थेच्या ५०० मीटरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करू नये, असा नियम असताना बेकायदा बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर पाषाण येथे ‘हाय एनर्जी मेटेरिएल्स रिसर्च लॅबोरेटरी’ (एचईएमआरएल) या संस्थेच्या ५०० मीटरच्या परिसरात कोणतेही बांधकाम करू नये, असा नियम असताना बेकायदा बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. पुणे महापालिकेने केलेली कारवाई योग्य असून, याचिकाकर्त्यांनी प्रत्येकी एक लाख रुपये महापालिकेकडे जमा करावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

पाषाण येथे पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाताना ‘एचईएमआरएल’ संस्थेच्या ताब्यात असलेल्या डोंगराच्या बाजूने अनेक फर्निचर विक्रीची दुकाने आहेत. ‘एचईएमआरएल’ ही संस्था संरक्षण खात्याशी संबंधित असून, सुरक्षेच्या दृष्‍टीने ही जागा अतिसंवेदनशील आहे. नियमांचे उल्लंघन करून या ५०० मीटरच्या आतमध्ये बांधकामे करण्यात आली. त्यामुळे या संस्थेने पुणे महापालिकेकडे तक्रार करून ही अनधिकृत बांधकामे पाडून टाकावीत अशी वारंवार मागणी केली होती.

नोव्हेंबर महिन्यात याच ठिकाणी बांधकाम विभागाने मोठी कारवाई केली होती. महापालिकेच्या नोटिशीच्या विरोधात या ठिकाणच्या सहा व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेचे वकील ॲड. अभिजित कुलकर्णी, ऋषिकेश पेठे यांनी उच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली. ती ऐकून घेऊन न्यायालयाने महापालिकेने केलेली कारवाई योग्य असा निर्णय दिला.

तसेच याचिकाकर्त्यांनी चुकीची माहिती दिल्याने सहा जणांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम महापालिकेने वसूल करून ती सामाजिक संस्थांना देण्याचे आदेशात नमूद केले आहे, असे विधी सल्लागार ॲड. निशा चव्हाण यांनी सांगितले. महापालिकेने फर्निचरच्या दुकानांवर कारवाई केली होती. याविरोधात दाखल झालेल्या याचिकेचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने लागला आहे. विधी विभागाचा सल्ला घेऊन पुढील कारवाई केली जाईल.

- बिपिन शिंदे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

'राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्‍या गद्दारांना पाडाच'; शरद पवारांचा अजितदादांच्या आमदारांना इशारा

Ajit Pawar: पार्थ पवार म्हणतात, भाजप-शिवसेनेसोबत गेल्याने आम्ही बदलणार नाहीत; आम्ही तर...

Fraud Calls : अलर्ट! या नंबरवरुन येणारे कॉल आहेत धोक्याचे; क्षणात होऊ शकतो मोबईल हॅक अन् अकाउंट रिकामं

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम, आता एक व्हावे लागेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT