High Speed Railway sakal
पुणे

High Speed Railway : पुणे- हैदराबाद हायस्पीड रेल्वे यार्डातच; केंद्राकडून मिळेना मान्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे आणि हैदराबादमधील अंतर कमी करणाऱ्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर मार्गिकेच्या आराखड्यास (डीपीआर) केंद्र सरकारच्या रेल्वे बोर्डाकडून (रेल्वे मंत्रालय) अद्यापही ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे हा प्रकल्प दोन वर्षांपासून कागदावरच राहिला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून या प्रकल्पास मान्यता आणण्यासाठी पुण्यासह जिल्ह्यातील आमदारांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने देशात आठ ठिकाणी ‘बुलेट ट्रेन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. मुंबई ते हैदराबाद असे सुमारे ७११ किलोमीटरचे अंतर आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर हे अंतर साडेतीन तासांत पार करणे शक्य होणार आहे.

या रेल्वेचा मार्ग पीएमआरडीएच्या हद्दीतील लोणावळा, देहू व सासवड या हद्दीतून जातो. मात्र पीएमआरडीच्या विकास आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित केला नव्हता. तो समाविष्ट करण्यासाठी हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने पीएमआरडीएला पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन पीएमआरडीएने प्रस्तावित विकास आराखड्यात हा मार्ग दर्शविला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली आहे.

परंतु हाच मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील फुरसुंगी आणि लोहगावच्या हद्दीतून जातो. फुरसुंगी येथे महापालिकेने दोन नगररचना योजना (टीपी स्कीम) प्रस्तावित केल्या असून दोन्ही योजनेचे प्रारूप महापालिकेने प्रसिद्ध केले आहे. त्यावर हरकती-सूचनांसाठी लवाद नेमला आहे. उर्वरित गावांच्या विकास आराखड्याचे काम सुरू आहे.

मात्र नगररचना योजना आणि प्रस्तावित विकास आराखड्यात महापालिकेने हा रेल्वे मार्ग दर्शविला नाही. महापालिकेने त्यास मान्यता दिल्यानंतर रेल्वे मार्गिकेच्या आराखड्याचे काम पूर्ण करून तो कॉर्पोरेशनकडे सादर करण्यात आला. छाननीनंतर दोन वर्षांपूर्वी तो आराखडा रेल्वे बोर्डाकडे सादर केला.

मात्र रेल्वे मंत्रालयाकडून त्यास मान्यता मिळाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आली. राज्यात महायुतीचे सरकार आहे. आता तरी हा प्रकल्प मार्गी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रकल्पाच्या ठळक बाबी

  • साडेतीन तास - किती वेळात अंतर कापणार

  • १४ हजार कोटी रुपये - प्रकल्पाचा अंदाजे खर्च

  • ७५० - प्रवासी क्षमता

  • २२० ते ३५० प्रतिकिलोमीटर - रेल्वेचा वेग

  • ७११ किलोमीटर - मुंबई- हैदराबाद अंतर

इतर वैशिष्ट्ये....

  • भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

  • महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांतून ही रेल्वे जाणार

  • मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे

  • या रेल्वेसाठी स्वतंत्र लोहमार्ग टाकण्याचे नियोजन

  • भूकंप झाल्यास आपोआप ब्रेकिंग सिस्टीम

  • तातडीने भूकंप शोध आणि अलार्म सिस्टीम (यूपीएडीएएस)

  • काही मार्ग इलेव्हेटेड तर काही मार्ग भुयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT