pcmc sakal
पुणे

Pune : रिक्षाचा संप पीएमपीला लाभला !

पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रवासी संख्या १५ लाखांपेक्षा जास्त

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : रिक्षा संघटनांनी सोमवारी केलेल्या संपामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी, पीएमपीच्या तिजोरीत मात्र पहिल्यांदाच भरघोस उत्पन्न जमा झाले आणि १५ लाखांहून अधिक प्रवाशांनी पीएमपीच्या बसचा वापर केला. पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक झाली आहे.

या पूर्वी ४ जानेवारी २०१६ आणि १४ नोव्हेंबर रोजी दोन कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा पीएमपीला पार करता आला होता. परंतु, त्या वेळी पास विक्रीची रक्कम २० लाखांहून जास्त होती. यंदा प्रथमच निव्वळ तिकिट विक्रीतून उत्पन्न वाढले आहे. पीएमपीने दोन्ही शहरांबाहेरील जिल्ह्यातील ११ मार्गांवरील वाहतूक २६ नोव्हेंबर रोजी बंद केली आहे. त्यामुळे त्या मार्गांवरील १०० बसही शहरातंर्गत वाहतुकीसाठी पीएमपीला वापरता आल्या.

पीएमपीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या आणि ई- बसची संख्या वाढत आहे. या बसचा प्रवास आरामशीर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांचा पीएमपीकडे वाढता कल असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

‘पीएमपीएमएल’स्थापनेपासून (२००७) प्रथमच.......

- निव्वळ तिकीट विक्रीतून मिळाले १ कोटी ९२ लाख ८ हजार ९६८ रुपये तर, पास विक्रीतून १२ लाख ६२ हजार आणि एकूण उत्पन्न २ कोटी ४ लाख ७८ हजार ७२३ रुपये

- एकूण १७४० बस रस्त्यावर धावल्या; एरवी पीएमपीच्या सरासरी १६०० बस रस्त्यावर असतात

- एकूण १५ लाख ४७ हजार प्रवाशांनी केला बसचा वापर

कोरोना काळात बंद झालेल्या पुणे रेल्वे स्थानकावरून ८ मार्गांवरील पीएमपीची बससेवा आता पूर्ववत करण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. पुणे स्टेशनजवळील मोलेदिना बसस्थानक येथून बस सुटल्यावर पुणे रेल्वे स्टेशन समोरील लेन क्रमांक ४ येथे प्रवाशी चढ-उतार करून नियमित मार्गाने वाहतूक करणार आहेत. वाहतूक बुधवारपासून (ता. ३०) सुरू होणार आहे

या मार्गांवरील वाहतूक होणार सुरू

१- ५७ - पुणे स्टेशन ते वडगांव/वेणूताई कॉलेज

२- १४४ - पुणे स्टेशन ते एनडीए गेट नं. १०

३- १४०- पुणे स्टेशन ते अप्पर डेपो

४ - ३३३ (बीआरटी) - पुणे स्टेशन ते हिंजवडी

५ - १५८ - म.न.पा. भवन ते डी. वाय. पाटील कॉलेज

६ - १६३ (बीआरटी) - पुणे स्टेशन ते खराडी, ढोले पाटील कॉलेज

७ - ३१२ (बीआरटी) - पुणे स्टेशन ते पुणे स्टेशन ते चिंचवडगांव

८ - १५८ - म.न.पा. भवन ते डायमंड वॉटर पार्क, दादाची पडळ (वाघोली)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT