IISER Sakal
पुणे

Pune IISER : शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आयसरच्या सायन्स सेंटरचा टिंकरींग प्रकल्प

प्रयोगातून विज्ञान आणि विज्ञानातून संशोधनाला चालणा देण्यासाठी अनेक शाळांमध्ये अटल टिंकरींग प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

प्रयोगातून विज्ञान आणि विज्ञानातून संशोधनाला चालणा देण्यासाठी अनेक शाळांमध्ये अटल टिंकरींग प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.

पुणे - प्रयोगातून विज्ञान आणि विज्ञानातून संशोधनाला चालणा देण्यासाठी अनेक शाळांमध्ये अटल टिंकरींग प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशिक्षणाच्या अभावाने शिक्षकांना त्याचे प्रभावी संचालन करता येत नाही. हीच गरज ओळखून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरतर्फे विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयसरच्या सायन्स सेंटरने टाटा टेक्नॉलजीजच्या सामाजिक उत्तरदायीत्व निधीतून (सीएसआर) ‘स्टेम रेडी’ प्रकल्पांतर्गत शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येते. ९ जानेवारी २०२३ पासून सुरू झालेल्या पाच दिवसीय कार्यशाळांच्या मालिकेत शिक्षक आठवड्यातून एक दिवस आयसर पुणेला कार्यशाळेसाठी येतात. या कार्यशाळांमध्ये मुख्यतः सरकारी आणि सरकार-अनुदानित शाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांनी कमी किमतीच्या आणि सहज उपलब्ध साहित्यापासून स्टेम प्रयोग केले आणि त्यांची निरीक्षणे नोंदवली. पुढील तीन वर्षात सुमारे ४०० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याचा आयसरचे प्रयत्न आहे.

कार्यशाळेची उद्दीष्ट्ये -

- शिक्षकांना अटल टिंकरींग लॅबच्या परिपूर्ण वापरासाठी प्रशिक्षीत करणे

- प्रयोगातून विज्ञान शिक्षणाला प्रोत्साहन देणे

- सहज-सोप्या विज्ञान शिक्षण वस्तूंची निर्मिती करणे

‘स्टेम’ -

एस - सायन्स (विज्ञान) - मूलभूत संकल्पना समजून घेणे

टी - टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) - रोजच्या वापरात विज्ञान आणने

इ- इंजिनीअरींग (अभियांत्रिकी) - प्रत्यक्ष उपयोजित गोष्टी विकसित करणे

एम - मॅथेमॅटीक्स (गणित) - विज्ञानातील डेटा आणि गणित समजून घेणे

कार्यशाळेतील उपक्रम -

तारांचा वापर करून वेगवेगळे इलेक्ट्रिकल सर्किट बनवणे, फोम बोर्ड वापरून प्रोटोटाइप बनवणे आणि गणिताची सूत्रे समजावून सांगणे, खगोलीय वस्तूंचे मॉडेल्स तयार करणे, कप्पीचा वापरून जड वस्तू उचलणे, इलेक्ट्रॉनिक्स प्रोटोटाइपिंग, मोटर्स आणि एलईडीचे नियंत्रण, निरीक्षणासाठी लहान परिसंस्थांची निर्मिती, मातीविरहित शेती आणि गणितातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी कोड्यांचा वापर, आदी

कृतीयुक्त शिक्षण शिक्षकांपर्यंत नेण्याच्या प्रयत्नातून हा प्रवास सुरू झाला. अगदी सुरवातीलाच पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची कार्यशाळा घेतली गेली. आठवड्यातून एक दिवस, असे पाच दिवस शिक्षकांना स्टेम अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितातील प्रयोगशील शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

- डॉ. चैतन मुंगी, प्रकल्प समन्वयक

आयसरच्या कृती आधारीत प्रशिक्षणामुळे पाचवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित विषय शिकविण्यासाठी खुप मदत झाली. विशेष म्हणजे आजवर ऋक्ष वाटणाऱ्या या विषयांची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. काळानूरूप बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या प्रशिक्षणामुळे करता आला.

- अंगद शिंदे, शिक्षक, श्रीराम माध्यमिक विद्यालय, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT