अनाधिकृत झोपड्यांवर पाटबंधारे विभागाची धडक कारवाई  sakal
पुणे

पुणे : अनाधिकृत झोपड्यांवर पाटबंधारे विभागाची धडक कारवाई

दिवसभर चाललेल्या या कारवाईत सुमारे तीनशेच्यावर झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या.

कृष्णकांत कोबल

हडपसर : येथील औद्योगिक वसाहती मागील मुठा कालव्यालगत दोन्हीही बाजूने नव्याने होत असलेल्या व काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेने संयुक्तपणे कारवाई केली. दिवसभर चाललेल्या या कारवाईत सुमारे तीनशेच्यावर झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

येथील पाटबंधारे विभागाच्या मोठ्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमणे झालेली होती. चार वर्षांपूर्वी केलेल्या एका कारवाईत अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्यानंतर औद्योगिक वसाहतीमागील बाजूस पुन्हा नव्याने अतीक्रमणे झाली होती. ती दीड महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईत काढून टाकण्यात आली होती. मात्र, पुन्हा नव्याने पन्नास ते साठ पत्र्याची शेड ठोकून अतिक्रमणे करण्यात आली होती. पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्याने आज दिवसभर पोलीस बंदोबस्तात कालव्याच्या दोन्हीही बाजूकडील अतिक्रमणे काढण्यात आली. पाच जेसीबीसह दहा डंपरद्वारे ही कारवाई झाली.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई चालू झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. सुमारे एक किलोमीटर अंतरात सलग पत्र्याची शेड मारून ही अतिक्रमणे केली होती. अतिक्रमणे हटविल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी तारेचे कुंपन ओढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, राजू अडागळे यांच्या नेतृत्वाखाली तीनही विभागातील सुमारे चारशे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. कारवाई सुरू होताना झोपडपट्टीधारक व पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

"हडपसर परिसरात मोठ्याप्रमाणात पाटबंधारे विभागाची जमीन आहे. त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. ती काढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. पुढील काळात टप्याटप्याने सर्व अतिक्रमणे काढून जागा मोकळ्या करण्यात येणार आहेत. आज झालेल्या कारवाईतील नागरिकांना दोनतीन वेळा नोटीस देवूनही त्यांनी जागा सोडली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.'

- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT