PMP-Bus Sakal
पुणे

PMP Bus : ‘पीएमपी’ची अपुरी संख्या; बसअभावी प्रवासी बेहाल!

सकाळ वृत्तसेवा

‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी १२ लाख असणारी प्रवासी संख्या आता १३ लाख झाली आहे.

पुणे - ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी १२ लाख असणारी प्रवासी संख्या आता १३ लाख झाली आहे. प्रवासी वाढत असले, तरी बसची संख्या वाढत नाही. परिणामी अपुऱ्या बसमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बसथांब्यांवर ताटकळत उभे राहावे लागत असून, कंटाळून प्रवासी अन्य खासगी वाहनांनी प्रवास करीत आहेत. यामुळे प्रवाशांसह पीएमपीचे आर्थिक नुकसान होत आहे.

लोकसंख्येच्या निकषानुसार, एक लाख लोकसंख्येसाठी ५० बसची आवश्यकता आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व ‘पीएमआरडीए’च्या काही भागांचा विचार केल्यास लोकसंख्या ही ७० लाखांच्याही पुढे जाते. तेव्हा ‘पीएमपी’च्या ताफ्यात किमान तीन हजार ५०० बस असणे गरजेचे आहे. मात्र, ‘पीएमपी’कडे या संख्येच्या निम्म्याच बस उपलब्ध आहेत. शहरात खासगी वाहनांचा वापर कमी करायचा असल्यास ‘पीएमपी’ची वाहतूक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी बसच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे.

दोन डेपोंचे काम सुरू...

‘पीएमपी’चे चऱ्होली व निगडी हे दोन डेपो इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. दोन्ही डेपोंचे काम ८० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. डेपोला वीजपुरवठ्याचे कामही बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. महिना-दोन महिन्यांत हे दोन्ही डेपो सुरू होतील. मात्र, तेथे प्रवासीसेवा देण्यासाठी ‘पीएमपी’कडे ई-बस नाही. चऱ्होलीला ७० व निगडीला ११० बसची मागणी पीएमपी प्रशासनाने केली आहे. मात्र, अद्याप त्या बस ‘पीएमपी’ला मिळाल्या नाहीत.

प्रवाशांना फटका!

  • बसची संख्या कमी असल्याने काही मार्गांवरच्या प्रवाशांना अर्धा ते एक तास वाट बघावी लागते. यामुळे बसच्या वेटिंगच्या प्रमाणात वाढ होणे, हे पीएमपीसाठी नुकसानकारक आहे.

  • बसमध्ये प्रवाशांना बसण्यास जागा नसते, ते उभे राहूनच प्रवास करतात.

  • फेऱ्यांची संख्या कमी होते.

  • सायंकाळी गर्दी जास्त असते. अनेक प्रवाशांना बसमध्ये जागाच मिळत नाही.

गरज ३५०० बसची, धावतात १६५०

मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर प्रवाशांना फिडर सेवा द्यावी लागेल. मात्र, ‘पीएमपी’कडे फीडर सर्व्हिस देण्यासाठी बसच नाही अशी परिस्थिती आहे. १३ लाख प्रवाशांसाठी एक हजार ६५० बस कमी पडत आहेत. लोकसंख्येचा मानकांचा विचार केल्यास ‘पीएमपी’कडे किमान तीन हजार ५०० बस असणे गरजेचे आहे.

पीएमपी दृष्टिक्षेपात

  • २१८५ - एकूण बस संख्या

  • १६५० - प्रत्यक्षात बस

  • १३ लाख - दैनंदिन प्रवासी संख्या

  • ३५०० बस - गरज किती

  • १.६० लाख - प्रवासी उत्पन्न

  • २२ लाख प्रवासी - ३५०० बस झाल्यास

लोकसंख्येच्या तुलनेत विचार करता ‘पीएमपी’ला आणखी बसगाड्यांची आवश्यकता आहे. बस वाढल्यास निश्चित सेवेत वाढ होईल. ३५० ई-बसपैकी आणखी १९२ बस ‘पीएमपी’ला मिळणे अपेक्षित आहे.’’

- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे

बसच्या कमतरतेचा फटका थेट प्रवाशांना बसतो. प्रवाशांचा महत्त्वाचा वेळ हा बसची वाट पाहण्यातच जातो. तसेच याचा परिणाम बसच्या फेऱ्यांवरही होतो. ‘पीएमपी’ने बसच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे.’’

- संजय शितोळे, सदस्य, पीएमपी प्रवासी मंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray यांच्या बैठकींचा धडाका! पुण्यातील 'या' ८ मतदारसंघात शिलेदार ठरले

नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाआधीच्या विधींना उत्साहात सुरुवात; फोटो पाहून नेटकरीही करतायत कौतुक

Latest Maharashtra News Updates : परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर

Sharad Pawar: आचारसंहिता जाहीर झाली तरी मविआत गोंधळाचं वातावरण! शरद पवार निभावणार मध्यस्थीची भूमिका

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजप विरोधात बंडखोरी? शिवसेना शिंदे गट उमेदवार देण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT